eknath Shinde, amit shah, devendra fadnavis, ajit pawar  Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra politics suspense : सस्पेन्स वाढला ! शाह-शिंदेंची तासभर बंद दाराआड चर्चा; फडणवीसांसोबतची बैठकच झाली नाही तर अजितदादा..

Political News : रविवारी दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत तासभर बंद दाराआड चर्चा झाली. त्यामुळे या बैठकीत काय चर्चा झाली यावरून सस्पेन्स वाढला आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : केंद्रीय गृहमंत्री रायगड येथील कार्यक्रमाच्या निमित्ताने तीन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी काही कार्यक्रमासोबतच महायुतीमधील नेतेमंडळींचे भेट घेत गेल्या काही दिवसापासून सुरु असलेले नाराजीनाट्य दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. शुक्रवारी रात्रीपासून त्यांचा पुण्यातील मुक्कामापासून बैठकीचा सिलसिला सुरु झाला. त्यांनतर शनिवारी रायगड व मुंबईत बैठका झाल्या तर त्यांनतर रविवारी दुपारी भोपाळला रवाना होइपर्यंत बैठकांचे सत्र सुरूच होते. या सर्व बैठकामुळेच सस्पेन्स आणखीनच वाढला आहे.

विशेष म्हणजे शनिवारी रात्री उशिरा सीएम देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची बैठक झाली नाही तर रविवारी दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत तासभर बंद दाराआड चर्चा झाली. त्यामुळे या बैठकीत काय चर्चा झाली यावरून सस्पेन्स वाढला आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी दुपारपासूनच नियोजित कार्यक्रमामुळे मुंबई बाहेर होते.

केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) गेल्या तीन दिवसापासून राज्यात ठाण मांडून बसले होते. त्यामुळे नक्कीच महायुतीमधील तीन घटक पक्षातील संबंध ताणले गेले असल्याची चर्चेला महत्व आले आहे. रायगड, नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा काही सुटताना दिसत नाही.

अमित शाह यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन केले होते. त्यानंतर ते मुंबईत आले होते. मुंबईत शनिवारी रात्री उशिरा सह्याद्री अतिथीगृह येथे अमित शाह यांची शिंदे आणि फडणवीस यांच्यासोबत बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर सीएम फडणवीस व शाह यांच्यासोबत स्वतंत्र बैठक होणार होती. मात्र, ती बैठक झाली नाही.

रविवारी मुंबईत एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यात सह्याद्री अतिथीगृह येथे तासभर चर्चा झाली. या बैठकीत निधीवाटपासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे. राज्यात सगळं काही ठीक होईल, असे आश्वासन अमित शाह यांनी शिंदेंना दिले आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आमच्यात कोणतीही धुसफूस नसल्याचे वक्तव्य माध्यमांसमोर केले आहे. एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्या बैठकीवेळी तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नव्हते. याशिवाय रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे याबाबतचा सस्पेन्स कायम आहे.

या बैठकीनंतर आमच्यात काही धुसफूस नाही. आम्ही सगळे खूशखूश आहोत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. आम्ही काम करणारे लोकं आहोत. काम करणारे लोक तक्रारीचं रडगाणं गात नाहीत. आम्ही रडणारे नाही लढणारे लोकं आहोत. असेल काहीतरी तर बसून चर्चेतून सगळं सुटणार, असे एकनाथ शिंदे म्हणाले. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील याबाबतच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीत सर्व सुरळीत असल्याचा दावा अजित पवार यांनी देखील केला आहे.

सीएम फडणवीस-शाह यांची बैठक झाली नाही

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी दुपारी सुनील तटकरेंच्या घरी भोजनाचा आस्वाद घेतला होता. त्यानंतर रात्री उशीरा अमित शाह हे मुंबईत आले होते. ते मुंबईत आल्यानंतर सह्याद्री अतिथीगृहावर त्यांची सीएम फडणवीस यांच्यासोबत बैठक होणे अपेक्षित होते. मात्र, काही कारणास्तव ही बैठक झाली नसल्याचे समजते.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT