Pune Bus Rape Case accused datta Gade  Sarkarnama
महाराष्ट्र

Swargate Bus Rape Case: स्वारगेट अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट; 'त्या' नराधमाचे शेवटचे लोकेशन पोलिसांना सापडले; ड्रोन, श्वान पथक गुणाट गावात दाखल

Pune Bus Rape Case: पुणे पोलिसांना दत्ता गाडेचे शेवटचे लोकेशन हाती आले आहे. त्यानुसार त्याच्या मुळगावी लपला असण्याची शक्यता असल्याने त्याचा शोध ड्रोनच्या मदतीने घेतला जात आहे.

सरकारनामा ब्युरो

Pune news : पुण्यात मंगळवारी एक धक्कादायक घटना घडली. शहरातील स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये मंगळवारी पहाटे एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना उघड झाली. तरुणीवर अत्याचार करून आरोपी फरार झाला आहे. बलात्कार केलेल्या नराधम आरोपीचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे. या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला शोधण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत.

पोलिसांची तेरा पथके त्याच्या शोधात आहेत, तर दुसरीकडे दत्ता गाडेला पकडून देणाऱ्याला पोलिसांनी एक लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे. पुणे पोलिसांना दत्ता गाडेचे शेवटचे लोकेशन हाती आले आहे. त्यानुसार त्याच्या मुळगावी लपला असण्याची शक्यता असल्याने त्याचा शोध ड्रोनच्या मदतीने घेतला जात आहे. शिरुर तालुक्यातील गुणाट गावातीलच उसाच्या शेतात लपल्याचा संशय असून तपास यंत्रणा शोध घेत आहे.

या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे हा शिरूर तालुक्यातील गुणाट गावचा रहिवासी आहे. याच गावात आरोपी दत्ता गाडे यांचे घर आहे. स्वारगेटमध्ये अत्याचार केल्यानंतर गाडे याने थेट शिरूर गाठले. मंगळवारी सकाळी 5.30 वाजता घडलेल्या या घटनेचा गुन्हा संध्याकाळी दाखल झाला. तोपर्यंत आरोपी त्याच्या गावात फिरत होता. परंतु त्याला गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाल्यावर तो सावध झाला. आरोपीच्या शोधासाठी सर्वच पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. तांत्रिक विश्लेषणसोबत 13 टीम त्याच्या शोधासाठी बाहेर पडल्या आहेत. ड्रोन कॅमेऱ्यामार्फत आरोपीचा शोध घेतला जात आहे. पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेकडून याठिकाणी देखील तपास सुरू करण्यात आला आहे.

गावातील प्रत्यक्षदर्शी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा शिरूरमधील ऊसाच्या शेतात लपला असल्याची शंका आहे. त्याचबरोबर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे विविध पथकांकडून शोध सुरू आहे. घटना घडल्यानंतर दुपारी 2 वाजल्यापासून आरोपी गाडे याचा फोन बंद आहे. गाडे याच्यावर यापूर्वी शिक्रापूर याठिकाणी 2 गुन्हे तर शिरूर, कोतवाली, सुपा आणि स्वारगेट पोलिस ठाण्यात (Police station) असे एकूण 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पुण्यातील घटना घडल्यानंतर थेट त्याचे गाव शिरूर गाठले होते. आरोपी दत्तात्रय गाडे हा मंगळवारी पहाटे बलात्कार करुन शिरुर तालुक्यातील गुनाट या त्याच्या गावी गेला. गावातील किर्तनाच्या कार्यक्रमात देखील तो सहभागी झाला. त्यानंतर बुधवारी सकाळपर्यंत तो गावातच होता. मात्र, दुपारी माध्यमांमधुन त्याचे फोटो आणि नावासह बातम्या सुरु झाल्या तेव्हा तो गायब झाला, असल्याचे समजते.

शिरुर तालुक्यातील गुनाट या त्याच्या गावी पोलीस उसाच्या शेतात ड्रोनच्या सहाय्याने त्याचा शोध घेतला जात आहे. शिरूरच्या साळुंखे फार्म हाऊस परिसरात पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. पोलिसांसोबतच श्वानपथक देखील आरोपीच्या शोधासाठी तैनात करण्यात आले आहे. 48 तासापासून पोलिसांकडून आरोपी दत्तात्रय गाडेचा शोध सुरू आहे. बलात्कार केल्यानंतर आरोपी गाडे थेट त्याच्या गुणाट गाव परिसरात आला असल्याचे समजते.

आरोपी याच गुणाट गावाच्या परिसरातील उसाच्या शेतात लपवून बसला असण्याची ही शक्यता आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी श्वान पथक बोलावले असून त्या मार्फत आरोपीचा शोध घेतला जातो आहे. आरोपी दत्तात्रय गाडे याच्या गावाला अक्षरशः छावणीचे स्वरूप आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT