
Pune News : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये मंगळवारी (ता.25) पहाटे एका 26 वर्षीय तरूणीवर एका नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडडकीस आली. यानंतर आता राज्यभर या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. या घटनेनंतर सर्व नेते, मंत्री, पोलिस प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले असून विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. विरोधकांसह राज्यातील जनतेची मागणी नराधम दत्ता गाडेला कठोर शिक्षा करण्याची केली जात आहे. मात्र 48 तास ओलंडूनही तो सापडलेला नाही. या घटनेनंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट बस स्थानकाला भेट दिली असता त्यांना तृप्ती देसाईंच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. त्यांचा ताफा तृप्ती देसाईंकडून अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सध्या देसाईंसह अन्य काही महिलांना पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे.
मंगळवारी (ता.25) पहाटे एका 26 वर्षीय तरूणीवर फलटणची बस गाडी दाखवण्याच्या बहाण्याने नराधम दत्ता गाडेने बलात्कार केला. तसेच त्याने तेथून पळ काढला. याची तक्रार त्याच तरूणीने पोलिसांत दिल्याने ही धक्कादायक घटना उघडकीस आली. पण अद्याप हा नराधम मोकाट असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी एकूण तेरा पथकं धाडली असून अद्याप तो सापडलेला नाही. यावरूनही पोलिसांसह सरकारवर आता टीकेची झोड वाढली आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
दरम्यान आता या प्रकरणात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी देखील उडी घेत थेट गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. योगेश कदम आज (ता.27) स्वारगेट बस बसस्थानकाला भेट देण्यासाठी आले होते. यानंतर देसाईंसह अन्य काही महिलांना पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे.
यावेळी तृप्ती देसाई यांनी, स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक अद्याप अटक झालेली नाही. तो शरण येण्याची वाट पोलिस पाहत आहेत का? लोकशाही मार्गानं आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतलं जात असून घटना घडून 50 गृहराज्यमंत्री येथे येत आहेत. यामुळेच त्यांना याचा जाब विचारचा होता. राज्यात नेमकं काय सुरू आहे हे विचारण्यासाठी त्यांचा ताफा अडवल्याचे म्हटलं आहे.
या प्रकरणातील आरोपी आता पोलिसांना सापडत नाही, कसली यंत्रणा आहे? एकीकडे एक लाखाचं बक्षीस जाहीर करायचं मग पोलिसांना लाखो रुपये पगार कसला देता? त्यांना पगार फुकट देता का? पोलीस निष्क्रीय बनले आहेत का? अशा प्रश्नांचा भडीमारा तृप्ती देसाई यांनी करताना आरोपी दत्ता गाडेचा कोणाचे संरक्षण आहे? त्याच्या राजकीय संबंध कोणाशी आहे? हे पाहवं लागेल. कारण राजकीय दबावानं अनेक प्रकरणं दाबली गेली असून संतोष देशमुखांचं प्रकरणही दाबण्याचा प्रयत्न झाला. वाल्मिक कराड त्याचेच उदाहरण असल्याचेही तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.
आता लोक रस्त्यावर उतरले असून सरकार गाडे सरेंडर होण्याची वाट बघतय का? एकीकडे 50 टक्के सवलत आणि एसटीचा प्रवास महिलांना सुरक्षित वाटतं होता. पण आता येथेही पण महिला सुरक्षित नसून, पुणे पोलीस पूर्णपणे अपयशी ठरल्याचा दावा तृप्ती देसाईंना केला आहे.
लोकप्रतिनिधी लोकांच्या मतांवर निवडूण आले असून त्यांना लोकशाहीत जाब विचारण्याचा अधिकार आहे. आम्ही तेच करत आहोत. पण आंदोलन करणाऱ्यांनाच सीपी, अॅडिशनल सीपी, कॉन्स्टेबल ओढून अशा पद्धतीने जबरदस्ती ओढून बाजूला करत आहेत. यामुळे आता त्या नराधमाला अटक करा नाहीतर आमच्या ताब्यात द्या, त्याचा आम्हीच निकाल करू. याआधीही वाल्मिक कराड सरेंडर झाला त्याला पोलिसांना पकडण्यात यश आले नाही. आता ही हा आरोपी सरेंडर होण्याची तुम्ही वाट पाहत आहात का? गृह राज्यमंत्री योगेश कदम इथं कोणत्या तोंडानं आलेत? आधी आरोपीला घेऊन या. पुणे पोलिस पूर्ण अपयशी ठरले असून कोयता गँग येथे गाड्या जळत आहेत. आता या प्रकरणात पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीला ताब्यात घ्यावं अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशारा तृप्ती देसाईंनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.