Tanaji Sawant, rishiraj Sawnat  Sarkarnama
महाराष्ट्र

Rishiraj Sawant : ...तर बँकॉककडे जाणारे विमान माघारी फिरवणे अवघड गेले असते; पोलिसांनी दिली धक्कादायक अपडेट

Tanaji Sawant News : पुणे पोलीस आयुक्तांनी एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. त्यानुसार आणखी थोडा उशीर झाला असता तर बँकॉककडे जाणारे विमान वळवणे अवघड झाले असते, अशी माहीती पोलिस यंत्रणेने दिली.

सरकारनामा ब्युरो

Pune News : राज्याचे माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांच्या अपहरणाच्या वृत्तामुळे सोमवारी सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. संपूर्ण पोलिस यंत्रणा शोध घेत होती. त्यावेळी ऋषिराज सावंत हे दोन मित्रांसोबत बँकॉकला निघाले असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिस यंत्रणेने अतिशय वेगाने तपास करीत अवघ्या दोन ते तीन तासातच हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांचे विमान माघारी वळवण्यात आले. मात्र, या प्रकरणात आता पुणे पोलीस आयुक्तांनी एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. त्यानुसार आणखी थोडा उशीर झाला असता तर बँकॉककडे जाणारे विमान वळवणे अवघड झाले असते, अशी माहीती पोलिस यंत्रणेने दिली.

सोमवारी दुपारनंतर ऋषिराज सावंत यांचे अपहरण झाल्याची माहिती तपास यंत्रणेला कळली. त्या तक्रारीनंतर लगेचच पोलिसानी तपास कामाला सुरवात केली. पोलिसानी तपास सुरू केल्यानंतर ऋषिराज सावंत हे बँकॉककडे निघाल्याचे लक्षात आले. त्यानंतर हे बँकॉककडे जाणारे विमान माघारी कसे परतले? याचा संपूर्ण घटनाक्रमच पुणे पोलिसांनी सांगितला आहे. सावंतच्या अपहरणाची तक्रार ते बँकॉककडे जाणारे विमान कसं परतलं? पुणे पोलिसांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांच्या अपहरणाची तक्रार ते बँकॉकसाठी निघालेले विमान परत कसे आणण्यात आले, याबद्दलची माहिती दिली. तसेच त्यांनी आम्ही या सर्व घटनाक्रमाचा अभ्यास करत आहोत, असेही म्हटले आहे.

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या संपूर्ण प्रकराणाची माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे. यावेळी त्यांनी तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांच्या अपहरणाची तक्रार ते बँकॉकसाठी निघालेले विमान परत कसे आणण्यात आले, याबद्दलची माहिती दिली. त्यांनी आम्ही या सर्व घटनाक्रमाचा अभ्यास करत असल्याचे स्पष्ट केले आहे.

या प्रकरणी माजी मंत्री तानाजी सावंत यांनी अपहरणाची तक्रार दिली होती. ती अपहरणाची तक्रार अद्यापपर्यंत मागे घेतलेली नाही. ऋषिराज सावंत यांचे विमान जर देशाच्या बाहेर गेले असते तर ते वळवणे अवघड झाले असते. ऋषिराज सावंत यांच्या अपहरण संदर्भात तपासात काहीही आढळलेले नाही, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

... तर ते विमान वळवणे अवघड झाले असते

पुणे पोलिसांनी त्यादिवशी काही घटना घडण्याआधी त्यामध्ये हस्तक्षेप केला. विमान वाहतूक प्रशासनाला आम्ही मेल केला होता. त्यानंतर विमान परत आणण्यात आम्हाला यश आले. त्याचवेळी हे विमान जर भारत देशाच्या बाहेर गेले असते तर ते वळवणे अवघड झाले असते, असेही अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.

या सर्व घटनाक्रमाचा तपास सुरूच

सध्या आम्ही या सर्व घटनाक्रमाचा तपास करत आहोत. ऋषिराज सावंत हे बिझनेस मिटिंगसाठी बँकॉकला गेले होते का, हे अद्यापपर्यंत समोर आले नाही. त्यादिवशी तानाजी सावंत आणि त्यांचे कुटुंब खूप घाबरलेल्या अवस्थेत होते, असेही पुणे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT