Aditya thackeray, Uddhav thackery Sarkarnama
महाराष्ट्र

Shivsena UBT : खासदारांनी 'शॉक' देताच उद्धव ठाकरे पुन्हा 'ॲक्शन मोड'मध्ये; आता महाराष्ट्रातील पक्षवाढीसाठी रणनीती

Shiv Sena UBT strategy News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मरगळ आली आहे. त्यामुळे शिवसैनिकांत पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण करण्यासाठी प्र्यत्न केले जात आहेत.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मरगळ आली आहे. त्यातच आठ दिवसापूर्वीच ठाकरे सेनेच्या खासदारांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रचारात उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे उतरले नसल्याने नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा 'ॲक्शन मोड'मध्ये आले आहेत. त्यांनी शिवसैनिकांत पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण करण्यासाठी प्र्यत्न केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे सुद्धा संपूर्ण राज्यभरातील राजकीय परिस्थितीचा आणि पक्ष संघटनेचा आढावा घेणार आहेत. त्यासाठी 1 आणि 2 एप्रिलला मुंबईत संपर्कप्रमुखांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे एक एप्रिल आणि दोन एप्रिल रोजी राज्यभराचा आढावा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सोमवारी पार पडलेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासोबतच 1 आणि 2 एप्रिलला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी जिल्हा संपर्कप्रमुखांची बैठक बोलवली आहे. त्यात 1 एप्रिलला पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक घेण्यात येणार आहे. तर 2 एप्रिलला उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागातील जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे सुद्धा संपूर्ण राज्यभरातील राजकीय परिस्थितीचा आणि पक्ष संघटनेचा आढावा घेणार आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त मुंबईतील नगरसेवकांवर ठाकरेंच्या सेनेकडून नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम पक्षाकडून संपूर्ण राज्यात घेण्यात येणार आहेत. यासाठी मुंबईतील नगरसेवकांवर निरीक्षण म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तर मुंबईसह पहिल्या टर्ममधील खालील नगरसेवकांचा समावेश करण्यात आला आहे.

संपर्क प्रमुखांची जिल्हानिहाय यादी पुढीलप्रमाणे :

ठाणे जिल्हा - धर्मेंद्र काळे, नाशिक - सुहास वाडकर, नागपूर - किरण तावडे, वर्धा - सचिन पडवळ, सचिन पाटील - पालघर, निशिकांत शिंदे - चंद्रपूर, तुळशीराम शिंदे - धुळे, जितेंद्र वळवी - नंदुरबार, प्रमोद सावंत - जळगाव, सदा परब, चंगेज मुलतानी- अहिल्यानगर, चिंतामणी निवाटे - जालना, दीपक सावंत - हिंगोली, विश्वास शिंदे - बीड, सुनील मोरे - नांदेड, रमाकांत रहाटे - अमरावती, अनिल कदम - अकोला, हरी शास्त्री - वाशीम, जोसेफ कोळी - बुलढाणा, राज मुल्ला - भंडारा, शशिकांत झोरे - गोंदिया, विजय भनगे - यवतमाळ, विठ्ठल लोकरे - गडचिरोली, अंकित प्रभू - रायगड, गीतेश राऊत - रत्नागिरी, सुरेश पाटील - सिंधुदुर्ग, सोमनाथ सांगळे - पुणे, सत्यवान उभे - सातारा, स्वप्नील कुंजीर - सांगली, कैलास पाठक - सोलापूर, उदय दळवी - कोल्हापूर, आशिष चेंबूरकर - छत्रपती संभाजीनगर, राजू पाटील - परभणी, सुनील पाटील - धाराशिव, मुकेश साळुंके - लातूर.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT