Atul Save On Shiv sena : अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून दगाबाजी; आमचेच सदस्य फोडण्याचा प्रयत्न! मंत्री अतुल सावे म्हणाले, 'गोव्याला कोण कोण गेले? बोर्डिंग पास दाखवू का?'

Sambhajinagar ZP political News : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी भाजप-शिवसेनेमध्ये अडीच-अडीच वर्षाचा फाॅर्म्युला ठरला होता.
atul save, abdul sattar
atul save, abdul sattar sarkarnama
Published on
Updated on

BJP News : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी भाजप-शिवसेनेमध्ये अडीच-अडीच वर्षाचा फाॅर्म्युला ठरला होता. तीन दिवसानंतर अचानक काय झाले माहित नाही? शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी आमच्या पुरस्कृत सदस्यांसह अपक्ष आणि उद्धव ठाकरे सेनेच्या सदस्यांना आम्ही भाजपसोबत जाणार नाही, स्वतंत्र सत्ता स्थापन करणार, असे सांगणे सुरू केले. एवढेच नाही तर काही सदस्यांना गोव्याला घेऊन गेले, माझ्याकडे या सगळ्यांचे बोर्डिंग पास आहे, असा दावा करत मंत्री अतुल सावे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

आजही ते आमच्या सोबत आले असते तर त्यांना ठरल्याप्रमाणे उपाध्यक्ष पद दिले असते. पण त्यांच्या नेत्यांनी आम्हाला कुठलाही प्रतिसाद दिला नाही, की फोन केला नाही. शिवसेनेच्या (Shivsena) मनात वेगळेचं सुरू असल्याचे समजल्यानंतर आम्हीही जुळवाजुळव केली आणि आम्हाला 32 सदस्यांना पाठिंबा दिल्याचे सावे यांनी स्पष्ट केले. शिवसेनेतील दोन आमदारांना आपल्या नातेवाईकांना अध्यक्ष करायचे होते, म्हणून त्यांनीच युती ऐवजी उद्धव ठाकरे यांची शिवसेना व अपक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला. आमचेही सदस्य फोडण्याचा प्रयत्न केला, असा थेट हल्ला सावे यांनी शिवसेनेवर चढवला.

atul save, abdul sattar
Modi Shah political strategy : मोदी-शहांचे पुन्हा धक्कातंत्र; मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री बदलणार? घडामोडींना वेग...

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत भाजपचे (BJP) अविनाश गलांडे, जितेंद्र जैस्वाल यांची अनुक्रमे अध्यक्ष, उपाध्यक्ष पदावर बिनविरोध निवड झाल्यानंतर अतुल सावे यांनी माध्यमांना घडलेल्या घडामोडींचा घटनाक्रम सांगीतला. मुंबईत शिवसेना-भाजप युतीच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत पहिले अडीच वर्ष भाजपचा अध्यक्ष आणि शिवसेनेचा उपाध्यक्ष आणि अडीच वर्षांनी भाजपाच उपाध्यक्ष आणि शिवसेनेचा अध्यक्ष करण्याचे ठरले होते. पण नंतर शिवसेनेतील नेत्यांनी वेगळा विचार करून आमच्याशी कुठलाही संपर्क ठेवला नाही.

atul save, abdul sattar
Ashok Kharat Rape Case : राजकारण्यांचे भविष्य सांगणारा 'हायप्रोफाईल ज्योतिषाला' बलात्कार प्रकरणी बेड्या; 58 आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त; मर्चंट नेव्हीच्या माजी अधिकाऱ्याचा काळा कारनामा

शिवसेनेतील दोन आमदारांनी आपल्या मुलाला, पुतण्याला अध्यक्ष करण्यासाठी वेगळ्या हालचाली सुरू केल्यामुळे आम्हालाही गणित जुळवावी लागली आणि आम्ही ती जुळवली. शिवसेनेने आमच्यावर केसाने गळा कापल्याचा केलेला आरोप चुकीचा आहे. उलट त्यांनीच भाजपासोबत दगाबाजी केली. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्यासोबत आहे. शिवसेना नाही, पण याचा राज्याच्या युतीवर कुठलाही परिणाम होणार नाही. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सक्षम आहेत.

atul save, abdul sattar
Pune ZP : पुणे ZP अध्यक्षपदाचा मान दौंड तालुक्याला : भाजप आमदाराच्या मतदारसंघात राष्ट्रवादीची खेळी; उपाध्यक्षपदी वळसे पाटलांचा पुतण्या

सत्तारांनी मतदारसंघ सांभाळावा

अब्दुल सत्तार यांनी भाजपने आमचा केसाने गळा कापल्याचा आरोप केला, यावर अतुल सावे यांनी तुम्हाला मुलाला अध्यक्ष करायचे होते, त्यासाठीच तुम्ही शिवसेनेला सोबत घेतले, त्यांना गोव्याला नेले. तुम्ही आता शांत बसा आणि मतदार संघाकडे लक्ष द्या. भाजप आता तिथे पन्नास टक्के जागा जिंकला आहे, असा टोलाही अतुल सावे यांनी अब्दुल सत्तार यांना लगावला.

atul save, abdul sattar
Jayashree Thorat : चिमुकलीवरचा अ‍ॅसिड हल्ला! चेहरा-डोळा जळालं, बोलणंही कठीण; जयश्री थोरातांनी हेल्थ अपडेट देताच महाराष्ट्र संतापला...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com