Maharashtra Budget Session: बिनखात्याचा मंत्री राहीन पण पुन्हा तो विभाग घेणार नाही; आशिष शेलार नेमके असे का म्हणाले?

Dada Bhuse remark News : या अधिवेशन काळात सभागृहात राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यातच सभागृहात अनेक प्रश्न मांडण्यात आले त्यातच एका प्रश्नाच्या उत्तरावरून सभागृहात सर्वांनाच हसू अनावर झाले.
Ashish Shelar News
Ashish Shelar NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाचा बुधवारी तिसरा दिवस आहे. या अधिवेशन काळात सभागृहात राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यातच सभागृहात अनेक प्रश्न मांडण्यात आले त्यातच एका प्रश्नाच्या उत्तरावरून सभागृहात सर्वांनाच हसू अनावर झाले. यावेळी राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलेल्या एका सल्ल्यानंतर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी त्यावर मिश्किल टिप्पणी केली. त्यामुळे सभागृहात उपस्थित असेलल्या आमदार मंडळीत एकच हशा पिकला.

यावेळी सभागृहात शिक्षण विभागाशी संबंधित लक्षवेधीत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर दादा भुसे यांनी आशिष शेलार (Asish Shelar) यांना सल्ला दिला. या आधी आशिष शेलार हे खाते सांभाळत होते, या पुढेही त्यांनी या खात्याचा कार्यभार सांभाळावा, अशी मिश्किल टिपण्णी भुसे यांनी यावेळी केली. त्यावर बिनखात्याचा मंत्री राहीन पण शिक्षण विभागाचा मंत्री होणार नाही, असे मिश्किल उत्तर आशिष शेलार यांनी दिले.

Ashish Shelar News
BMC Shivsena News : स्वीकृत नगरसेवकपदासाठी शिंदेंच्या शिवसेनेत जुंपली! आमदार पुत्राची फिल्डिंग, जुने नेतेही लागले कामाला!

राज्यात ऑनलाईन गेमिंग ॲप्समुळे लहान मुलांमध्ये मानसिक ताण वाढून आत्महत्यांचे प्रकार घडत असल्याचा गंभीर मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला. आमदार निरंजन डावखरे (Nirnjan Davakhare) यांनी या संदर्भात कठोर कारवाईची मागणी करत IT कायद्यांतर्गत गुन्हे नोंदवावेत, अशी मागणी केली आहे.

Ashish Shelar News
BJP Rajya Sabha Candidates : महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री राज्यसभेवर जाणार! भाजपच्या राहिलेल्या 3 जागांसाठी तावडेंसह दानवे, मुंडे, पाटील यांची नावे चर्चेत

आरे कॉलनीत एका लहान मुलाने आत्महत्येपूर्वी ‘लॉग आउट’ असा उल्लेख केल्याची घटना घडली. एका मुलीने मोबाईल न दिल्याने आत्महत्या केल्याचा प्रकार त्यांनी सभागृहात मांडला. तसेच गाझियाबाद येथे तीन बहिणींनी ऑनलाईन टास्कच्या दबावाखाली आत्महत्या केल्याचा उल्लेख करत या प्रकारांकडे अत्यंत गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

Ashish Shelar News
congress Vs bjp :'भाजपची शेवटची फडफड, त्यांचा शेवट जवळ आलाय'; काँग्रेस उपमुख्यमंत्र्याची जळजळीत टीका

यावेळी सभागृहात आमदार डावखरे यांनी गेमिंग ॲप्स तयार करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्याची मागणी केली. फक्त ॲपवर बंदी हा उपाय नाही. एक गेम बंद झाला तर तोच गेम दुसऱ्या नावाने पुन्हा सुरू होतो. त्यामुळे IT कायद्याच्या कलम 108 अंतर्गत कठोर कारवाई व्हायला हवी. ऑनलाईन गेमिंगमुळे मुलांचे मानसिक आरोग्य बिघडत असून आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. शासन याबाबत नेमकी काय पावले उचलत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Ashish Shelar News
BMC Shivsena News : स्वीकृत नगरसेवकपदासाठी शिंदेंच्या शिवसेनेत जुंपली! आमदार पुत्राची फिल्डिंग, जुने नेतेही लागले कामाला!

टास्क फोर्सची स्थापना करणार : शेलार

या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले की, 2 फेब्रुवारी रोजी ऑनलाईन गेमिंग विषयावर एक टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. या टास्क फोर्समध्ये कायदा आणि न्याय विभागासह संबंधित सर्व यंत्रणांचा समावेश करण्यात आला आहे. पुढील अधिवेशनापूर्वी याबाबतचा अहवाल सादर करण्यात येईल. यासोबतच दोन्ही सभागृहांच्या सदस्यांची संयुक्त समिती स्थापन करण्याची घोषणाही त्यांनी केली. पालकांनी ‘डिजिटल लिटरेसी’ अंगीकारावी आणि मुलांसाठी ‘डिजिटल डाएट’ आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

Ashish Shelar News
NMC NCP Politics: आता सुनिल तटकरेच घालणार नगरसेवक मुकेश शहाणेंना लगाम, महापालिका स्थायी सभापती उमेदवारीतून भाजपशी पुन्हा पंगा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com