eknath shinde, shrikant shinde, uady samnat, rahul shevale
eknath shinde, shrikant shinde, uady samnat, rahul shevale Sarkarnama

Delhi Meeting : उदय सामंत, राहुळ शेवाळेंची 'दिल्लीत' शाळा? CM फडणवीसांसोबत वाढलेली जवळीक एकनाथ शिंदेंना खटकली

Delhi tour inside story News : दिल्लीत आल्यानंतर सामंत, शेवाळे यांनी श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी शिंदे पिता-पुत्रांची भेट घेतली.
Published on

Mumbai News : राज्यसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांनी धक्कातंत्राचा अवलंब करीत ऐनवेळी प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना उमेदवारी दिली. तर दुसरीकडे उमेदवारी न दिल्याने माजी खासदार राहुल शेवाळे नाराज असल्याची चर्चा रंगली. मात्र, शेवाळे यांची उमेदवारी कापण्यामागील नेमके कारण समोर आले आहे. त्यातच मंत्री उदय सामंत यांनी राहुल शेवाळे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला तरी शेवाळे यांची नाराजी दूर झालेली नव्हती. त्यातच सोमवारी रात्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी पीएम मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर मंगळवारी रात्रीच मंत्री उदय सामंत, राहुल शेवाळे यांना दिल्लीतून बोलावणे आल्याने दोघेही तातडीने दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत आल्यानंतर सामंत, शेवाळे यांनी श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी शिंदे पिता-पुत्रांची भेट घेतली. यावेळी सीएम देवेंद्र फडणीसांसोबत वाढलेली जवळीक एकनाथ शिंदेंना खटकल्याने त्यांनी उदय सामंत, राहुळ शेवाळेंची 'दिल्लीत' शाळा घेतल्याचे समजते.

नुकतीच झालेली मुंबई महापालिका निवडणूक ही भाजप (BJP) आणि शिवसेना ठाकरे पक्षासोबतच शिवसेना शिंदे पक्षासाठीही तितकीच महत्वाची निवडणूक होती. शिवसेनेचा जीव हा मुंबईत आहे, मुंबईत किती नगरसेवक निवडून आले यावरुन शिवसेना कोणाची यावर शिक्कामोर्तब होते. ‘मुंबईकडे तुम्ही लक्षही देवू नका, मै हूॅँ ना’ असा शब्द शिंदेंना राहुल शेवाळेंनी दिला होता. त्यांनीही मुंबईची निवडणूक शेवाळेंवर सोपवून निवांत राहिले.

eknath shinde, shrikant shinde, uady samnat, rahul shevale
Prajwal Revanna Case : माजी खासदाराविरोधात १३ हजार पानी आरोपपत्र, ३९ जणांविरुद्ध गुन्हे अन् अश्‍लील व्हिडिओसाठी ७० पेनड्राइव्ह...

दुसरीकडे भाजप या निवडणुकीत मुंबईत महापौर बसावयाचच या इराद्याने लढत होता, ते त्यांनी मिळवले. मात्र या निवडणुकीत मुंबईत शिवसेना शिंदे पक्षाचे जेमतेम 29 जागा निवडून आल्या. शिवसेना (Shivsena) शिंदे पक्षाला मुंबईत किमान 50 ते 60 जागा मिळाव्यात असे अपेक्षित होते, मात्र ती संख्या निम्म्यावर आली. शिवसेना ठाकरे पक्षाला मुंबईत उमेदवार देखील मिळू नये अशी व्यूहरचना शिंदे पक्षाने आखली होती. 2017 मध्ये शिवसेनेचे निवडून आलेले नगरसेवकच नाही, तर त्यापूर्वीच्या माजी नगरसेवकांना देखील शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश देण्यात आला. हा एवढा मोठा खटाटोप करताना पक्षाची मोठी ‘धनशक्ती’ कामी आली. तरी देखील निवडणुकीत केवळ 29 जागा निवडून आल्या.

eknath shinde, shrikant shinde, uady samnat, rahul shevale
Rupali Chakankar controversy : अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकरांचं पद जाणार? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यानं केलं क्लिअर...

मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर शेवाळेंनी भाजपने मुस्लिम मतदारसंघातील जागा दिल्या, त्याचा फटका बसल्याची सारवासारव केली. मात्र याबाबत जागा वाटपाच्या चर्चेत त्यांनी याविषयी वरिष्ठांसोबत काहीच चर्चा केली नाही. शिवाय महापालिका निवडणुकीतील पैशाच्या व्यवहाराविषयी देखील शेवाळेंवर पक्षाकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे समजते. अखेरीस मुंबईतील शिवसेना शिंदे पक्षाच्या अपयशाचे खापर शेवाळेंना राज्यसभेची उमेदवारी नाकारुन फोडण्यात आले.

eknath shinde, shrikant shinde, uady samnat, rahul shevale
Ashok Kharat Arrest : ...तर अशोक खरात निसटला असता; अटकेसाठी पोलिसांनी आखला होता खास प्लॅन! असे घुसले घरात

त्यानंतर यामध्ये अजून काही गोष्टींची भर पडली आहे, त्यामध्ये उदय सामंत आणि राहुल शेवाळेंनी शिवसेना शिंदे पक्षाच्या आमदारांचा गट तयार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उदय सामंत आणि राहुल शेवाळेंची जवळीक वाढल्याची चर्चा आहे, हे देखील शिंदेंना रुचले नसल्याची चर्चा आहे. तर अशा रितीने मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालाने राहुल शेवाळेंच्या हातातोंडाशी आलेला राज्यसभा उमेदवारीचा घास हिरावला गेला. शिवसेना शिंदे पक्षामुळे महापालिकेतील सत्ताही काठावर आली. मुंबईत शिवसेना शिंदे पक्षाला हातपाय पसरण्यासाठी पुन्हा प्रयत्न करावे लागणार आहेत.

eknath shinde, shrikant shinde, uady samnat, rahul shevale
Yogesh Tilekar : कचरा प्रकल्पात मोठा घोटाळा? भाजप आमदाराचा हात आणि फडणवीसांची साथ काँग्रेसचा गंभीर आरोप

त्यामुळेच सामंत, शेवाळे यांना मुंबईत बोलावून शाळा घेतली असती तर याची कानोकानी खबर सर्वाना लागली असती. त्यामुळेच सामंत आणि शेवाळे यांना दिल्लीत बोलावून घेण्यात आले होते. त्यानंतर बंददाराआड शिंदे पिता-पुत्रांनी या दोंघाची शाळा घेतली असल्याची बातमी बाहेर आली आहे.

eknath shinde, shrikant shinde, uady samnat, rahul shevale
Meghana Bordikar News : परभणीत गेम फिरवला, पालकमंत्री मेघना बोर्डीकर ठरल्या 'धुरंधर'!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com