Shivsena Uddhav Balasaheb Thackeray Party Sarkarnama
महाराष्ट्र

Shivsena UBT Meeting : उद्धव ठाकरे कॉंग्रेस, शरद पवारांवर टाकणार मोठा डाव; विरोधी पक्षनेतेपदासाठी 'ही' तीन नावे चर्चेत

Shivsena Meeting News : या बैठकीत येणाऱ्या अधिवेशनात कोणते विषय आमदारांनी मांडायचे? राज्यातील सामान्यांचे प्रश्न याशिवाय गाजत असलेले विषय मांडून सरकारला घेरण्यासाठीची रणनीती या आमदारांच्या बैठकीत ठरविण्यात आली.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पुढील आठवड्यात होत आहे. या अधिवेशनापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांची बैठक मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित पार पडली. या बैठकीत येणाऱ्या अधिवेशनात कोणते विषय आमदारांनी मांडायचे? राज्यातील सामान्यांचे प्रश्न याशिवाय गाजत असलेले विषय मांडून सरकारला घेरण्यासाठीची रणनीती या आमदारांच्या बैठकीत ठरविण्यात आली. या अधिवेशनावेळी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर उद्धव ठाकरे पक्ष हा दावा करणार असल्याचे बैठकीत ठरल्याचे समजते.

नागपूर येथे पार पडलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडीकडून विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यात आला होता. त्यावेळी महायुती सरकारकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी नियुक्ती करण्यात आली नव्हती. हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते पदाबाबत कोणताही निर्णय झाला नव्हता. मात्र आता शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आता ठाकरे गटाने या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेण्याची रणनीती ठरवली असल्याचे समजते.

ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक शुक्रवारी मातोश्रीवर पार पडली. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्याची जबाबदारी सर्व आमदारांवर सोपवली आहे. त्यासोबतच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विरोधी पक्षनेत्याची निवड करण्याचा निर्णय सर्व आमदारावर सोपवला आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

विधानसभा विरोधी पक्षनेते पदाबाबत विधानसभा अध्यक्ष सकारात्मक असल्यास ठाकरेंच्या शिवसेनेकडून विरोधी पक्षनेत्या संदर्भात नाव या अधिवेशनात दिले जाणार आहे. हिवाळी अधिवेशन उलटून सुद्धा विधानसभा विरोधी पक्षनेते संदर्भात निर्णय झाला नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत विचार केला जाऊ शकतो.

येत्या काळात ठाकरे गटाच्या वाट्याला विरोधी पक्षनेतेपद आले तर या पदासाठी तीन जण प्रबळ दावेदार आहेत. त्यामुळे ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव, ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची नावे चर्चेत आहेत. या तीन जणांपैकी एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. या बैठकीप्रसंगी विरोधी पक्षनेता निवडीचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांना दिले असल्याची माहिती सूत्राने दिली.

बैठकीत या विषयावर झाली चर्चा

दरम्यान, या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्राने दिली. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि पक्षातून होत असेल आउटगोइंग थांबवणे, संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आमदारांसोबत उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. त्यासोबतच अधिवेशनात घ्यावयाच्या भूमिकेबाबत मार्गदर्शन केले असल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT