Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी सायंकाळी पाच वाजता संपणार आहे. गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या प्रचाराचा धुरळा आता बसणार आहे. राज्यातील सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांवर केलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले असताना आता बुधवारी मतदान होत आहे. त्यातच रविवारी रात्री मुंबईत महाविकास आघाडीच्या प्रचाराची सांगता सभा पार पडली. यावेळी झालेल्या सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडे यांचा विशेष उल्लेख केला. (Uddhav Thackeray News)
मुंबईत महाविकास आघाडीच्या सांगता सभेस ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar), काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह आघाडीतील तीन घटक पक्षाचे नेतेमंडळी उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांच्या घणाघाती भाषणातून राज्यातील महायुती सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा विशेष उल्लेख केला. आपण जिंकणार आहोत पण राज्यभर फटाके फुटणार आहेत पण जर महाझुठी जिंकली तर गुजरातमध्ये फटाके फुटणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पंकजा मुंडे बोलल्या आहेत, त्याचा व्हिडीओ आहे. 'पंकजाताई तू एक फार मोठे काम केले आहेस, महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी तू काढली आहेस, जशी आमच्या चंद्रचूड साहेबांनी न्यायदेवतेच्या डोळ्यावरुन काढून स्वत:च्या डोळ्यावर बांधली होती, तशी तू आमच्या महाराष्ट्राच्या डोळ्यावरील पट्टी काढली, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
पंकजा मुंडे यांनी काय सांगितलं, त्यांचे शब्द वेगळे आहेत, मी त्या काय म्हणाल्या ते सांगतो, किती आहेत बुथ आपल्याकडे 90 हजार, प्रत्येक बुथवरती भाजपचे दक्षता पथक आहे. 90 हजार बुथवर दक्षता पथके म्हणजे एकापेक्षा अधिक माणसे असणार आहेत, एक माणूस धरला तर 90 हजार माणसं, दोन धरली तर 1 लाख 80 हजार, तर तीन असतील तर त्याच्या पटीत असतील, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
या निवडणुकीसाठी सगळी माणसं गुजरातमधून महाराष्ट्रात आणली जात आहेत. ही माणसे आज नजर ठेवायला आणली आहेत. उद्या आपली मुंबई आणि महाराष्ट्र बळकवण्याचा यांचा डाव आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. हे तर काही फेक नरेटिव्ह नाही, पंकजा मुंडे बोलल्यानंतर मी बोलतोय, असे उद्धव ठाकरे म्हणाले. याचा अर्थ असा की इथली भाजप हरलेली आहे, इथल्या भाजपमध्ये लोक राहिलेले नाहीत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात राहणाऱ्या भाजपच्या प्रेमींवर भाजपच्या नेतृत्त्वाचा विश्वास नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाल
बॅगच्या कंपनीला लिहिणार पत्र
माझा आणखी एक प्रश्न आहे. अनेक निवडणुका बघितल्या, शिवसेनेचा स्टार प्रचारक म्हणून फिरतोय. किमान दोन ते तीन वेळा माझी बॅग तपासली गेली. त्या बॅगच्या कंपनीला पत्र लिहिणार आहे. ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नेमा असे सांगणार आहे. बॅग हो तो ऐसी हो सबको लगे चेक करो. माझ्या बॅगा तपासल्या हरकत नाही, हे जे पथक फिरतंय, रात्री राहतात कुठंय, त्यांचा खर्च कोण करतंय, कुणासाठी फिरतात, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.