Karahad News : माझ्या मुलाच्या लग्नात झालेला खर्च हा ऑन रेकॉर्ड आहे. मी, माझी पत्नी इन्कमटॅक्स भरतो. सर्व कागदपत्र माझ्याकडे आहेत. कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्यास मी तयार आहे, असे प्रत्युत्तर पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी उबाठा शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टिकेला दिले. दोन मंत्री आणि आठ आमदार उबाठा शिवसेनेच्या संपर्कात आहेत असे उबाठा पक्षाकडून सांगण्यात येते तर संपर्कातील आमदारांची नावे जाहीर करा, असे आव्हान त्यांनी या प्रसंगी दिले.
मंत्री देसाई म्हणाले, 'माझ्या मुलाच्या लग्नात झालेल्या सर्व खर्चाच्या चौकशीला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून मला हे अपेक्षित नव्हते. निवडणुकीच्या प्रचाराला येताना कोणी कोणाच्या लग्नात खर्च केला इतक्या वैयक्तिक पातळीवर जाऊन उद्धव ठाकरे बोलत असतील तर त्यांच्याकडे विकासाचा मुद्दा नाही हे दिसते, असेही शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) म्हणाले.
ते स्वतःला संस्कृत नेता समजतात. माझ्या आजोबांच्या राजकीय जीवनावर भाष्य करण्याइतपत उद्धव ठाकरे मोठे नाहीत. माझे आजोबा काँग्रेसचे मंत्री असले तरी त्यांच्याकडून आमच्या परिवारावर झालेल्या राजकीय अन्यायामुळे आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. आजही शिवसेना व बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कधीही सोडलेले नाहीत आणि सोडणारही नाही.
आम्ही खुलेआम सुरतला गेलो. लपून छपून गेलो नाही. तुम्ही मुख्यमंत्री होता. मुख्यमंत्र्यांना इंटेलीजन्सचे सातत्याने ब्रीफींग होत असते. त्यामुळे तुम्हाला हे कळले नाही हे तुमचे अपयश आहे. माझ्या मुलाच्या लग्नात झालेला खर्च हा ऑन रेकॉर्ड आहे. मी, माझी पत्नी इन्कमटॅक्स भरतो. सर्व कागदपत्र माझ्याकडे आहेत. कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्यास मी तयार आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कधीही सोडले नाहीत
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी कशा पध्दतीने महाविकास आघाडी केली आणि शिवसेना पक्ष कोणाच्या दावणीला बांधला आहेत, हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. आजही शिवसेना व बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कधीही सोडलेले नाहीत आणि सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संपर्कातील आमदारांची नावे जाहीर करा
दोन मंत्री आणि आठ आमदार उबाठा शिवसेनेच्या संपर्कात आहेत असे उबाठा पक्षाकडून सांगण्यात आले. त्या प्रश्नावर मंत्री देसाई म्हणाले, आमचे कोणते दोन मंत्री व आठ आमदार संपर्कात आहेत. त्यांची नावे जाहीर करावी. त्यांच्या बंगल्याच्या बाहेर, आतील बाजुला सीसीटीव्ही आहेत. त्याचे फुटेज काढुन त्यांनी ती नावे जाहीर करावे, असे आव्हान त्यांनी ठाकरे यांना दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.