Eknath Shinde, Chhagan Bhujbal  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल; म्हणाले, "माझा राजीनामा..."

संपत देवगिरे : सरकारनामा

Chhagan Bhujbal On Eknath Shinde : 16 नोव्हेंबरला मी मंत्रीमंडळाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 17 नोव्हेंबरला अंबडच्या ओबीसी मेळाव्याला गेलो होते, असा गौप्यस्फोट मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) शनिवारी ( 3 फेब्रुवारी ) केला होता. यानंतर आज रविवारी ( 4 फेब्रुवारी ) भुजबळांनी राजीनाम्यावरून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांना सवाल विचारला आहे. "माझा राजीनामा मंजूर का करीत नाहीत," अशी विचारण भुजबळांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

राज्य सरकारतर्फे आयोजित 'वारी आपल्या दारी', 'श्री संत तुकाराम सार्थ गाथा घरोघरी' हा कार्यक्रम नाशिमध्ये पर पडला. यावेळी मंत्री भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार माणिकराव कोकाटे आणि अन्य राजकीय नेते, वारकरी, कीर्तनकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

( राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा! )

"...म्हणून मी शांत होतो"

भुजबळ म्हणाले, "मी 16 नोव्हेंबरला अंबड येथील सभेला जाण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयात मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा, याची कुठेही वाच्यता करू नका, असा निरोप देण्यात आला होता. त्यामुळे मी काहीही बोललो नाही. पुढे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मला बोलावून 'ओबीसींचे काम शांततेत करायला पाहिजे. तुम्ही ओबीसी विषयी मत मांडण्यास आमचा विरोध नाही. मात्र, राजीनाम्याची वाच्यता करू नका,' असं म्हटलं होतं. त्यामुळे मी शांत होतो."

"मी राजीनामा दिला आहे, पण..."

"नुकताच एक आमदार माझ्याविषयी बोलला की, यांच्या कमरेत लाथ घाला. यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा. मी मंत्रीपदाला चिकटून बसलो आहे, असे कोणालाही वाटू नये. त्यामुळे मी माझ्या राजीनाम्याबाबत जाहीरपणे बोललो. इतर कोणाला ते नाटक वगैरे वाटू नये म्हणून मी पुन्हा सांगतो आहे. मी राजीनामा दिला आहे. पण, जोपर्यंत राजीनामा मंजूर होत नाही, तोपर्यंत मला काम करावेच लागेल," असं भुजबळांनी स्पष्ट केलं.

Edited By : Akshay Sabale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT