Bacchu Kadu Warning To BJP : बच्चू कडूंचा भाजपला कडक इशारा; ‘आधी विधानसभेचं बोला; मगच लोकसभेसाठी आमच्याकडे या’

Loksabha Election : आमचा ताळमेळ बसला नाही तर आम्ही जळगाव, अमरावती जिल्ह्यात निवडणुका लढवू. आमचा दावा लोकसभेसाठी नाही.
Bacchu Kadu
Bacchu KaduSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : भारतीय जनता पक्ष मोठा आहे, त्यांना लोकसभेत रस आहे. आमचे लक्ष्य विधानसभा आहे, त्यामुळे विधानसभेबाबत भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी. त्यानंतरच आम्ही त्यांचा लोकसभा निवडणुकीसाठी विचार करू, असा इशारा प्रहार संघटनेचे प्रमुख तथा आमदार बच्चू कडू यांनी दिला. (First Talk About Assembly Election then come to us for Lok Sabha : Bacchu Kadu)

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबाबत पक्षाची तयारी कशी सुरू आहे, या प्रश्नाचे उत्तर देताना आमदार कडू यांनी भाजपला हा इशारा दिला आहे. आमचं राजकारण फक्त शेतकऱ्यांच्या सोयीचं आणि विधानसभेपुरते मर्यादीत आहे. भाजपला लोकसभा महत्वाची, तशी आम्हाला विधानसभा आहे. विधानसभेच्या वाटाघाटी झाल्या तरच लोकसभेला आम्ही भाजपसोबत राहू, असे आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bacchu Kadu
Mangalvedha Water Issue : ‘फडणवीसांचा शब्द खरा करणार; आघाडी सरकारचे पाप धुण्याचे काम सध्या करतोय’

आमचा ताळमेळ बसला नाही तर आम्ही जळगाव, अमरावती जिल्ह्यात निवडणुका लढवू. आमचा दावा लोकसभेसाठी नाही. भाजपने याबाबत पुढाकार घेतला, तर लगेच लोकसभेचे काम सुरू करू अशी खुली ऑफरसुद्धा आमदार कडूंनी या वेळी दिली. प्रहार हाच आमचा कोटा असून, आम्हाला दुसऱ्या कोट्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महादेव जानकर आणि राजू शेट्टी यांच्यासमवेत लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ही बैठक होईल, असे कडू म्हणाले.

आंबेडकरांच्या मनात काय ते मी कसे सांगू?

महाविकास आघाडीसोबत जाणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्या मनात काय आहे, हे मी सांगू शकणार नाही. ते बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आहेत. माझ्यासारख्यांनी त्यांच्यावर बोलणं योग्य नाही. त्यांच्यासारख्या मोठ्या माणसाच्या मनात काय सुरू आहे, हे मला माहीत नाही, अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली.

Bacchu Kadu
Ajit Pawar Baramati Visit : अजित पवारांचा निर्वाणीचा इशारा; ‘...तर आमदारकीबाबत मी वेगळा निर्णय घेईन’

नवीन निर्णय घ्यायची आमची ताकद नाही

वेगवेगळ्या समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असे सध्याचे वातावरण आहे. आरक्षणाचा मुद्दाही समोर आहे. याबाबत २० तारखेला पत्रकार परिषद घेऊन मी बोलणार आहे. समाजात वाद होणार नाही, याची काळजी आमचा पक्ष घेईल. येत्या २० तारखेच्या बैठकीत नवीन आघाडीबाबत घोषणा करणार काय, या प्रश्नाचे उत्तर देताना आमदार कडू म्हणाले की, नवीन निर्णय घ्यायची आमची ताकद नाही. पक्षाचे फक्त दोन आमदार आहेत. समाजाने आम्हाला ताकद दिली, तर आम्ही नक्की विचार करू, असा सूचक इशाराही कडू यांनी दिला.

Edited By : Vijay Dudhale

Bacchu Kadu
Ajit Pawar Solapur Tour : चंदनशिवेंच्या घरी जाणे अजितदादांनी का टाळले? राष्ट्रवादीतील गटबाजी ठरली वरचढ

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com