Sharad Pawar  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar: काँग्रेस शहराध्यक्ष हल्ला प्रकरण; शरद पवार म्हणाले, 'केंद्र अन् राज्य सरकारच्या...'

Shirdi Political News : ...या सर्वांची प्रकृती गंभीर असून त्यांना संगमनेर येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

Pradeep Pendhare

Shirdi News : शिर्डी शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चौगुले व माजी नगरसेवक सुरेश आरणे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेध करत या हल्ल्याची चौकशी होऊन आरोपींना कडक शिक्षा व्हावी, याकरिता काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निवेदन देण्यात आले. केंद्र व राज्य सरकारच्या दहशतवादाविरुद्ध एकत्रित लढा, आपण लढणार आहोत, असे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

शिर्डी येथे सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात शिर्डी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सचिन चौगुले व सुरेश आरने यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांना निवेदन दिले.अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, कृषीभूषण प्रभावती घोगरे, तालुकाध्यक्ष पंकज लोंढे, राष्ट्रवादीचे शिर्डी विधानसभा मतदारसंघ प्रमुख सुधीर मस्के, विक्रांत दंडवते, साहिल मस्के उपस्थित होते.

मंगळवारी आश्वी बुद्रुक येथे रिपब्लिकन नेते बाळासाहेब गायकवाड यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानंतर शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले व माजी नगरसेवक सुरेश आरणे हे लोणी मार्गे शिर्डी येथे परतत होते. मात्र, राजकीय हेतूने पाळत ठेवून दहा-बारा गुंडांनी त्यांच्यावर लोखंडी गज, हॉकी स्टिक व चोपरने वार करत त्यांना गंभीर जखमी केले. या सर्वांची प्रकृती गंभीर असून त्यांना संगमनेर येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.(Shirdi Politics)

या घटनेने संपूर्ण राज्यामध्ये एकच खळबळ उडाली असून यामधील आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा करावी, याकरता शिर्डी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Congress) कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना निवेदन दिले. प्रशासनाने न्यायपद्धतीने काम करत आरोपींना तातडीने अटक करावी व यामागचा सूत्रधार शोधून त्याच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद पवार म्हणाले, 'केंद्र व राज्य सरकार हे अत्यंत सूडपद्धतीने वागत आहे. राज्यात कायदा व्यवस्था संपूर्णपणे ढासळली असून शिर्डी व परिसरामध्ये अत्यंत दहशतीचे वातावरण आहे.या विरोधात आपल्या सर्वांना एकत्रित होऊन लढा द्यायचा आहे'. या प्रकरणाचा मी पाठपुरावा करणार असून दोषीना तातडीने अटक झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.यावेळी या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.

शिर्डीत अत्यंत दहशतीचे सावट

शिर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये नागरिकांना भीती व दहशतीमध्ये ठेवले जात आहे लोकशाही पद्धतीने कोणी आवाज उठवला तर अतिरिकीपणे गुंड पाठवून त्याला धमकावले जात आहे. यापूर्वी असे अनेक प्रकार झाले असून ही दडपशाही तातडीने थांबली पाहिजे अन्यथा जनता रस्त्यावर येईल असा कडक इशारा महिला नेत्या सौ प्रभावती ताई घोगरे यांनी दिला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT