Dada Bhuse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dada Bhuse: नार्वेकरांवर शंका घेणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयालाच आव्हान ; भुसेंचा ठाकरेंवर पलटवार...

MLA disqualification result : आपल्या बाजूने निकाल लागला तर चांगले विरोधात गेला तर वाईट, अशी उद्धव ठाकरेंची भूमिका.

संपत देवगिरे : सरकारनामा

Dada Bhuse : विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी दिलेला आमदार अपात्रतेचा निकाल अतिशय अभ्यासपूर्ण आणि विचार करून दिलेला आहे. मात्र, उद्धव ठाकरे त्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. असे प्रश्न करणे म्हणजे न्यायालयालाच आव्हान दिल्यासारखे आहे. एकनाथ शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी थेट ठाकरे गटावर पलटवार केला आहे.

शिवसेनेच्या 16 आमदारांना अपात्र करण्याच्या विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या निकालावर अनेक बाजूने टीका होत आहे. ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल कायदेतज्ञांसह महापत्रकार परिषद घेऊन नार्वेकर यांच्या निकालाची चिरफाड केली होती. त्याला राज्यभरातून प्रतिसाद मिळाला होता. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गटाकडून देखील ठाकरे यांच्यावर पलटवार होऊ लागला आहे.

यासंदर्भात दादा भुसे म्हणाले, उद्धव ठाकरे नार्वेकर यांच्या निकाल देण्याआधी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. आपल्या बाजूने निकाल लागला तर चांगले विरोधात गेला तर वाईट, अशी त्यांची भूमिका सुरुवातीपासून दिसत होती. त्याचा अनुभव आता सबंध राज्याला येऊ लागला आहे. सभापती राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर टीका करून ठाकरे एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयावरच शंका व्यक्त करीत आहे, हे बरोबर नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रत्येक न्यायाला दोन बाजू असतात. ज्याला तो न्याय मान्य नाही, त्याला दाद मागण्याची तरतूद आणि अधिकार आहे. मात्र न्यायावरच प्रश्नचिन्ह निर्माण करून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा शिवसेना उद्धव ठाकरे गट जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहे. लोकशाहीमध्ये हे अभिप्रेत नाही, असे भुसे म्हणाले. एकंदरच ठाकरे गटाने महापत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाला जनतेमध्येच आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता.

मुख्यमंत्री शिंदे आणि विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांच्या कामकाजावर गंभीर प्रश्न निर्माण केले होते. त्यामुळे शिंदे गट आणि नार्वेकर दोघेही अस्वस्थ आहेत. नार्वेकर यांनी लगोलग पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिल्याने त्याला दुजोरा देखील मिळाला आहे. मात्र यातून आगामी काही काळ शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न चर्चेत राहील, हे स्पष्ट झाले आहे.

(Edited by Amol Sutar)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT