Dada Bhuse News : 'राम मंदिर हे बाळासाहेबांचे स्वप्न पण...', ठाकरे गटावर मंत्री दादा भुसे घसरले

Political News : धुळे लोकसभेसाठी दादा भुसेंच्या मुलाची चर्चा पण जागावाटपबाबत माहीत नसल्याचे...
Dada Bhuse
Dada Bhuse Sarkarnama
Published on
Updated on

Shiv sena Politics : रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून निमंत्रण मिळाले नाही, यावरून उद्धव ठाकरे गटाकडून भाजपला टार्गेट केले जात आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वतः प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला राजकीय स्वरूप देऊ नका, असे म्हणत नरेंद्र मोदींवर टीका केली होती. भाजप-ठाकरे गटात सुरू असलेल्या या वादात शिंदे गटाच्या मंत्र्याने उडी घेतली आहे.

Dada Bhuse
Beed lok Sabha Constituency : बीड लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार ठरला? प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी...

ठाकरे गटाचे नेते काहीही विधाने करत सुटले आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीसा साजेशी भुमिका घ्यावी, असे टोला मंत्री दादा भुसे यांनी लगावला आहे. तसेच राम मंदिर उभारणे हे बाळासाहेंबांचे स्वप्न होते. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्ण करत आहेत. त्यामुळे त्यांना पाठींबा दिला पाहिजे, असे देखील भुसे म्हणाले.

२३ जानेवारी हा शिवसैनिकांसाठी प्रेरणा देणारा दिवस आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्‍म दिवस मोठ्या उत्‍साहाने साजरा केला जाईल. त्‍यांनी पाहिलेले स्‍वप्‍न आज पूर्ण होत आहे, असे सांगत विरोधकांनी महाराष्ट्राच्‍या संस्‍कृतीचे भान ठेवून बोलावे, असा सल्ला भुसे यांनी दिला.

...मुलाला उमेदवारी मिळणार?

दादा भुसे यांच्या मुलाला उमेदवारी मिळणार. धुळे लोकसभा मतदार संघातून ते निवडणुकीसाठी इच्छुक असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यावर दादा भुसे यांनी थेट उत्तर देणे टाळले. मात्र, याबाबत आपल्याला कोणी काही सांगितले नाही. लोकसभेच्या जागा वाटपा बद्दल ही आपल्याला माहिती नसल्याचे भुसे म्हणाले.

(Edited By Roshan More)

Dada Bhuse
Ncp News : राष्ट्रवादीचा एक बडा नेता लोकसभेच्या तयारीत..!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com