Nashik Constituency 2024 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Constituency 2024 : नाशिकमध्ये राजकारण पेटले; महायुतीच्या नेत्यांवर गुन्हे दाखल

Rajabhau Waje : प्रचारा दरम्यान सोमवारी सिडकोमध्ये प्रचार फेरी दरम्यान भाजपच्या नेत्याने शिवसेना ठाकरे गटाच्या प्रचार कार्यालयावर हल्ला केला. भाजपच्या माजी नगरसेवकाने केला शिवसेना प्रचार कार्यालयावर हल्ला.

Sampat Devgire

Sudhakar Badgujar News : नाशिक शहरात लोकसभा निवडणूक (Nashik Loksabha Election) प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्यामुळे हा प्रचार मुद्द्यांवरून थेट गुददयांवर पोहोचला आहे. याबाबत पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिवसेना ठाकरे गटाने नाशिकच्या प्रचारात आघाडी घेतली आहे.

त्यामुळे आता निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीमध्ये चांगलाच संघर्ष पाहायला मिळत आहे. सोमवारी सिडकोमध्ये प्रचार फेरी दरम्यान भाजपच्या नेत्याने शिवसेना ठाकरे (Shivsena UBT) गटाच्या प्रचार कार्यालयावर हल्ला केला.

महायुतीच्या उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांची प्रचार फेरी निघाली होती. ही प्रचार फेरी शिवसेना ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांच्या कार्यालयासमोरून जात असताना वादग्रस्त नगरसेवक मुकेश शहाणे राजाभाऊ वाजे यांच्या प्रचार कार्यालयात घुसले.

त्यांनी कार्यालयातील कार्यकर्त्यांना दमबाजी करीत पक्षाचे चिन्ह असलेले मशाल तोडून फेकली. त्यामुळे दोन्ही गटामध्ये चांगलाच वाद निर्माण झाला. मात्र नेत्यांनी मध्यस्थी केल्याने प्रकरण थोडक्यात मिटले. एकंदरीत आता प्रचार चांगलाच टोकदार झाला आहे. दोन्ही गटात तणावाची स्थिती आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हा प्रकारानंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी अंबड पोलिस ठाण्यात तक्रार केली. शिवसेना ठाकरे गटाचे (ShivsenaUBT) कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमल्याने अखेर पोलि‍सांनी भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. हा प्रकार समजल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने जमले. यावेळी या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत पोलिस निरीक्षकांना धारेवर धरले.

त्यानंतर माजी नगरसेवक मुकेश शहाणे (Mukesh Shahane) अजित चव्हाण, जगन पाटील, दिलीप देवांग यांचे अनेक कार्यकर्ते जमले होते. त्या दबावामुळे पोलि‍सांनी भाजप कार्यकर्त्या अर्चना दिंडोरकर आणि सोनाली ठाकरे यांच्या तक्रारीवरून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

नाशिकमध्ये शेवटच्या टप्प्यात मतदान आहे. त्यामुळे राज्यभरातील नेते नाशिकला दौरे करीत आहेत. रोज होणारे मेळावे, सभा आणि प्रचार फेऱ्या यातून शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली आहे. आता प्रचार हातघाईवर गेल्याने पोलि‍सात गुन्हे दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे नाशिकच्या प्रचारात आता तणावाची स्थिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT