Praveen Gedam Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Teachers constituency Election : प्रवीण गेडाम यांच्या आदेशाने मुख्याध्यापकांना फुटला घाम...काय आहे कारण?

Election Officer Praveen Gedam Announcement : अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी मतदार यादीबाबत गंभीर तक्रारी केल्या होत्या. शिक्षक मतदार यादी बाबतच्या तक्रारीची निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण गेडाम यांनी गंभीर दखल घेतली आहे.

Sampat Devgire

Nashik, 25 June : नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचे मतदान उद्या होत आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण गेडाम यांनी एक घोषणा केली आहे.

अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांनी मतदार यादीबाबत गंभीर तक्रारी केल्या होत्या. अन्य एका उमेदवाराची ही तक्रार होती. शिक्षक मतदार यादी बाबतच्या या तक्रारीची निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण गेडाम ( Praveen Gedam) यांनी गंभीर दखल घेतली आहे.

शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत शिक्षक नसलेल्या व्यक्तीने अथवा बोगस मतदाराने मतदान केल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाणार आहे. यामध्ये यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी संबंधित शिक्षक ज्या संस्थेत काम करतो, तेथील मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र बंधनकारक असते. बोगस मतदार आढळल्यास संबंधित संस्थेच्या मुख्याध्यापकांवर थेट कारवाई होणार आहे.

आयुक्त गेडाम यांच्या या स्पष्ट निर्देशामुळे आता बोगस मतदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेषतः मुख्यध्यापकांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदानाच्या पूर्वसंध्येला मुख्यध्यापकांना अक्षरशः घाम फुटला आहे.

या निवडणुकीत महाविकास आघाडीचे संदीप गुळवे, महायुतीचे आमदार किशोर दराडे, अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महेंद्र भावसार यांच्यासह सुमारे 21 उमेदवार आहेत.

अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी आमदार दराडे यांच्या संस्थेतील यादीत अनेक बोगस मतदार असल्याची तक्रार केली होती. अनेक अल्पशिक्षित तसेच शिक्षण क्षेत्राशी संबंध नसलेल्या नागरिकांची नावे मतदार यादीत आहेत. त्यामुळे उद्या होणाऱ्या मतदानाकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT