Pathardi Social Workers Andolan sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nagar News : पाथर्डीत सीसीटीव्ही कॅमेरे बंद; सामाजिक कार्यकर्त्याचा बैठा सत्याग्रह

Pathardi Nagarparishad नगरपरिषदेने पाथर्डी शहराच्या सुरक्षिततेसाठी प्रमुख चौकात बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत

Pradeep Pendhare

Nagar News : गेल्या काही दिवसांपासून शोभेचे ठरत असलेल्या सीसीटीव्हीवरून पाथर्डीतील सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गर्जे हे नगरपरिषदेविरोधात आक्रमक झाले. बंद पडलेले सीसीटीव्ही पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी त्यांनी बैठा सत्याग्रह केला. लेखी आश्वासनानंतर गर्जे यांनी आंदोलन मागे घेतले.

नगरपरिषदेने पाथर्डी शहराच्या सुरक्षिततेसाठी प्रमुख चौकात सुमारे ५० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. यासाठी नगरपरिषदेने लाखो रुपये खर्च केला होते, परंतु हे कॅमेरे गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे बसवलेले हे सीसीटीव्ही कॅमेरे शोभेच्या गोष्टी ठरल्या होत्या. याविरोधात पाथर्डीतील सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गर्जे हे आक्रमक झाले आणि त्यांनी नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह सुरू केला.

या वेळी राहुल ढाकणे, सोनल जोजारे, सिद्धू मानुरकर, गणेश घुले, रमेश केरकळ, गंगा जातेगावकर, लक्ष्मण पावटेकर, उबेर आतार हेदेखील या आंदोलनात सहभागी झाले. पाथर्डी नगरपरिषदेने बसवलेले हे ५० सीसीटीव्ही कॅमेरे अल्पकाळासाठी सुरू होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची कार्यप्रणाली सुरू झाल्यापासून कधी बंद तर कधी चालू, असा खेळ सुरू होता. कॅमेरे बंद असूनही ठेकेदाराचे बिल अदा करण्यात आले.

आजच्या स्थितीला सर्व कॅमेरे बंद पडले. मात्र, ठेकेदाराने दुरुस्ती केली नाही. पाथर्डीची सुरक्षा वाऱ्यावर असून, बंद पडलेले कॅमेरे खर्च करण्यात आलेले लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. प्रशासन मात्र सुस्त आहे, असा आरोप मुकुंद गर्जे (Mukund Garje) यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पाथर्डी नगरपरिषदेने बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे हे बंद झाले असून, ते कधी सुरू होणार, अशा मजकुराचे फलक सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गर्जे यांनी शहरातील प्रमुख चौकात लावून यापूर्वी नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधले होते. आता आठ दिवसांत हे सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करणार असल्याचे लेखी आश्वासन नगरपरिषद प्रशासनाने दिल्याने मुकुंद गर्जे यांनी आंदोलन मागे घेतले.

Edited By : Umesh Bambare

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT