Sujay Vikhe patil, Prajakta Tanpure Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Prajakt Tanpure News: 'विखेंनी नगरच्या गुंडगिरी नेत्यांचे मांडलिकत्व स्वीकारलंय...', आमदार तनपुरेंनी इतिहासच काढला

Pradeep Pendhare

Nagar Political News : राहुरी येथील महाविकास आघाडीची सभा गाजवली ती, आमदार प्राजक्त तनपुरे यांनी. आमदार तनपुरे हे विखे नगरमध्ये करत असलेल्या सोयीच्या राजकारणावर या सभेत तुटून पडले. खासदार सुजय विखेंनी Sujay Vikhe नगर शहरातील गुंडगिरी नेत्यांचे मांडलिकत्व स्वीकारण्यावरून आमदार तनपुरेंनी केलेली टीका चर्चेचा विषय ठरली.

महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ राहुरी येथे आज दुपारी भर उन्हात सभा झाली. ही सभा गाजली, ती शरद पवार, उमेदवारी नीलेश लंके यांच्यापाठोपाठ आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केलेल्या भाषणाने! आमदार तनपुरे यांनी विखे यांच्या श्रेयवादी आणि सोयीच्या राजकारणावर हल्ला चढवला. सभेतील आमदार तनपुरे यांचा लागलेला सूर चर्चेचा विषय होता.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले, "विखेंना शिवसेनेने नगर शहरात गुंडगिरी नेत्यांविरोधात मदत केली होती. परंतु विखेंनी आज त्यांच्या तडीपार गुंडगिरी नेत्यांचे मांडलिकत्व स्वीकारल्याचे दिसते". विखे आता राहुरी तालुक्याला विखे गृहीत धरू लागले आहे. 50 वर्षांच्या राजकारणात राहुरी तालुका समजल्याचा दावा करत आहेत. परंतु राहुरी तालुका कोणाची जहांगीर नाही. राहुरी तालुक्यात कोणीही गृहीत धरू नये, असा इशारा आमदार तनपुरे यांनी दिला.

'राहुरी तालुक्याने मला विधानसभेला जेवढे मताधिक्य दिले होते, त्यापेक्षाही अधिक मताधिक्य महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके Nilesh Lanke यांना या मतदारसंघातून दिले जाईल. देशातील आणि राज्यातील विरोधी पक्ष संपवले जात आहेत. जनतेच्या भावना, वेदना सरकारपर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही विरोधी पक्ष म्हणून करीत असतो. केंद्रातील ईडी, सीबीआय यंत्रणांचा गैरवापर होत आहे. हा वापर म्हणजे केंद्र सरकार देश हुकूमशाहीकडे घेऊन चालला आहे', अशी टीका आमदार तनपुरे यांनी केली.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार होते. शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे सरसकट कर्ज माफ केले. कोविड काळात कुटुंबप्रमुख म्हणून सरकारने भूमिका निभावली. कोविडमधून सावरत असताना विकासकामांचा वेग मंदावू दिला नाही. महायुती सरकार सत्तेत आल्यावर विरोधकांची कामांचा विकास निधी थांबवला. विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. आजही विरोधकांना वेगवेगळ्या केंद्रीय यंत्रणेचा वापर करून नमवले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राहुरी कारखान्यातील स्क्रॅप विक्रीची चौकशी करणार

राहुरी सहकारी साखर कारखाना राज्यातील एक चांगला कारखाना म्हणून गणला जातो. मुख्यमंत्री वसंतराव नाईक, यशवंतराव चव्हाण आदी राज्यातील महत्त्वाचे नेते या कारखान्यावर एकत्र आले होते. चांगल्या कारभारासाठीचा आदर्श म्हणून हा कारखाना होता. तो आज बंद पाडला आहे. राहुरीतील डाॅ. तनपुरे सहकारी साखर कारखाना बंद पडला आहे. आमचे सरकार सत्तेत येणार आहे. येताच कारखान्यातील स्क्रॅप विक्रीची आम्ही निश्चितपणे चौकशी करू, असा इशारा आमदार प्राजक्त तनपुरे Prajakt Tanpure यांनी दिला.

(Edited By Deepak Kulkarni)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT