Sujay Vikhe Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nagar Political News : दिल्ली ते गल्ली आमचे सरकार ; राजळेंवर टीका करणाऱ्यांचा विखेंकडून समाचार..

Pathardi taluka work was started by MP Vikhe : टाकळीमानुर-करोडी रस्त्याच्या कामावरून पाथर्डी तालुक्यातील वातावरण तापले.

Pradeep Pendhare

Nagar Political News : पाथर्डी-शेवगाव विधानसभेच्या भाजप आमदार मोनिका राजळेंवर विरोधकांकडून होत असलेल्या टीकेचा खासदार सुजय विखे यांनी समाचार घेतला आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत आमचे सरकार असताना रस्ता त्यांचा कसा? असा सवाल खासदार सुजय विखेंनी केला आहे. पाथर्डी तालुक्यातील टाकळीमानुर ते करोडी सुमारे साडेआठ किलोमीटर रस्त्याच्या कामाचा प्रारंभ खासदार विखे यांच्या हस्ते झाला.

पाथर्डी (Pathardi) तालुक्यातील टाकळीमानुर-करोडी रस्त्याच्या कामावरून राष्ट्रवादी (NCP) चे नेते प्रताप ढाकणे, शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख विष्णुपंत ढाकणे आणि भाजपच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड, मढी देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड यांनी मढी देवस्थानच्या तसेच विविध मुद्द्यावरून आमदार राजळेंवर टीका केली होती. यावेळी अभय आव्हाड, माणिक खेडकर, संजय बडे, धनंजय बडे, बाळासाहेब नागरगोजे, बाबासाहेब ढाकणे उपस्थित होते.

विरोधक कोणत्या-कोणत्या मुद्यावरून आमदार राजळे यांना टार्गेट केले जात आहे. या टीकेचा खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. खासदार विखे म्हणाले, "या रस्त्याच्या कामाबाबत अनेकदा विरोधकांकडून राजकारण होऊन आरोप-प्रत्यारोप झाले. आमदार मोनिका राजळे (Monika Rajale) यांच्यावर खालच्या पातळीवर टिकाही झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मात्र विरोधकांनी या मतदारसंघात महिला लोकप्रतिनिधी आहे, म्हणूनच आमदारांवर टीकेची झोड उठवली आहे, ती निषेधार्थ आहे. मला टीका करणाऱ्यावर फार काही बोलायचे नाही आणि ती माझी इच्छाही नाही". टीका करणाऱ्यांनी माझ्या दोन प्रश्नांचे उत्तर द्यावे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून या रस्त्यासाठी निधी मिळाला ते मुख्यमंत्री कोणाचे आहेत? ते आमचे असून मुख्यमंत्र्याबरोबर आमदार आहेत मग रस्ता कोण मंजूर करणार? ग्रामसडक योजना समितीचे अध्यक्ष पालकमंत्री राधाकृष्ण विखे आहेत.

मग, प्रंतप्रधान, मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार आणि आमदार आमचेच तर रस्ता त्यांचा कसा? असा असावा देखील खासदार विखे यांनी विरोधकांना उपस्थित केला आहे. आमदार राजळे यांनी ढाकणे यांचे नाव न घेता जोरदार टीकी केली. नगर जिल्हात सर्वाधिक या रस्त्याची चर्चा होऊन हा प्रश्न गाजला गेला. रस्ता मंजूर झाल्यानंतर विरोधकांकडून आंदोलन करून लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करून धुळफेक करण्याचं काम हे दुर्दैवी आहे.

विरोधकांच्या महाविकास आघाडीच्या काळात एक किलोमीटरचाही रस्ता मंजूर झालेला नव्हता. मात्र आमच्या सरकारच्या काळात मंजूर झाल्याच्या कामाचं श्रेय घेण्यासाठी आम्ही रस्ता केला,आम्ही रस्ता खोदू असे म्हणणाऱ्या विरोधकांना आम्हाला रस्ता खोदण्याची वेळ आणू द्यायची नव्हती, असे आमदार राजळे यांनी म्हटले.

(Edited by Amol Sutar)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT