Monika Rajale : भाजपच्या 'त्या' पदाधिकाऱ्यांना आंदोलन भोवणार; मोनिका राजळेंचा मोठा इशारा

Pathardi Shevgaon : पाथर्डी-शेवगावमध्ये दुष्काळावरून राजकारण पेटले
Monika Rajale
Monika RajaleSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Political News : पाथर्डी-शेवगावमधील दुष्काळावरून भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आमदार यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यंतरी उपोषण केले. त्यास राष्ट्रवादीने पाठिंबा देत आमदार मोनिका राजळेंवर रोष व्यक्त केला. आता आमदार राजळेंनी आंदोलकांचा समाचार घेतला आहे.

"राजळे कुटुंबाने त्यांना राजकारणात पदे दिली. त्यांना खूप काही देऊनसुद्धा आमच्याकडून काय चूक झाली ते आता कळत नाही. मात्र, त्यांना सभापती करण्यामध्ये विष्णुपंत अकोलकर यांचा वाटा असून, ती चूक अकोलकर यांनी जाहीररित्या कबूल केली आहे. आता झालेली चूक दुरुस्त करा," असा इशारा आमदार मोनिका राजळेंनी दिला आहे.

Monika Rajale
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल, नेमके काय झाले ?

पाथर्डी-शेवगावमध्ये दुष्काळ जाहीर करावा, यासाठी भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी काही दिवसांपूर्वी उपोषण केले. त्यास राष्ट्रवादीचे क्षितिज घुले यांनी पाठिंबा दिला. या वेळी आमदार राजळेंच्या कार्यपद्धतीवर टीका करण्यात आली. यानंतर राजळेंनी तत्काळ प्रतिक्रिया देण्याचे टाळत संयमाची भूमिका घेतली. आता मात्र संधी मिळताच त्यांनी आंदोलनकर्त्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. 'हे आंदोलन म्हणजे, निवडणुका जवळ आल्याने सुरू केलेली हौस आणि राजकारणाचा एक भाग आहे,'अशी टीका आमदार राजळेंनी कुणाचेही नाव न घेता केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पाथर्डी तालुक्यातील साकेगाव येथे राज्य सरकारच्या पर्यटन विभागामार्फत सुमारे एक कोटी रुपये खर्चाच्या सभामंडपाचा लोकार्पण आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते झाले. या वेळी राजळे म्हणाल्या, "निवडणूक लागल्यानंतर अनेकांना आपल्या भवितव्याची काळजी सुरू होते. मात्र, मतदार हुशार झाला असून, आपल्या सुख दुःखासह विकासाच्या कामात कोण आपल्याबरोबर आहे, त्याच्याच मागे उभा राहतो. सात-आठ वर्षांत शेवगाव-पाथर्डी या दोन्ही तालुक्यांत त्या गावाची गरज ओळखून कोणताही दुजाभाव न करता विकासासाठी समान निधी वाटप केला".

Monika Rajale
Rahul Narwekar : बाहेर कोण बोलतोय म्हणून सरकार पडत नसते; नार्वेकरांचा आदित्य ठाकरेंना टोला

आता 2024 मध्ये सुरुवातीला राम मंदिराचे लोकार्पण होणार आहे. लोकसभेची आचारसंहिता लागू शकते. पुढचे वर्ष संपूर्ण निवडणुकीचे आहे. यामध्ये लोकसभा, महापालिका, पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा महत्त्वाच्या निवडणुका असून, यामध्ये आम्हाला सहकार्य करावे, असेही आवाहन राजळेंनी केले आहे.

बाजार समितीच्या नफ्यात वाढ

बाजार समितीच्या निवडणुकीत तुम्ही दिलेला विश्वासामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण सत्ता मिळू शकलो. संचालक मंडळाने चांगले निर्णय घेतल्याने बाजार समितीच्या नफ्यामध्ये चांगली वाढ झाली. आता ४० लाख रुपयांच्या ठेवी बँकेत आहेत, असेही राजळे म्हणाल्या.

(Edited by Sunil Dhumal)

Monika Rajale
MLA Nilesh Lanke : मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यानंतर लंके पोहाेचले शेतकऱ्यांच्या बांधांवर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com