Vanchit Bahujan Aghadi sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nagar Loksabha News : वंचित बहुजन आघाडीत उभी फूट; जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच दोन गटांत घोषणाबाजी

सरकारनामा ब्यूरो

Nagar Vanchit Bahujan Aghadi News : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिलीप खेडकर व जिल्हाध्यक्ष प्रतीक बोरसे यांनीही अर्ज दाखल केल्यामुळे पदाधिकाऱ्यांत समन्वय नसल्याचे या वेळी दिसून आले. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आपल्याच पदाधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे 'वंचित'मध्ये उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पक्षातील इच्छुकांनी मोठी गर्दी झाली होती. आज शेवटच्या दिवशी एमआयएम पक्षाच्या वतीने डॉ. परवेज अश्रफी यांनी तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिलीप खेडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

तसेच वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रतीक बोरसे यांनीही अर्ज दाखल केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकारामुळे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आणि इतर पदाधिकारी यांच्यामध्ये समन्वय नसल्याचे या वेळी दिसून आले. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आपल्याच पदाधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

त्यामुळे वंचितमध्ये उभी फूट पडल्याचे चित्र दिसून येत आहे. आपण वंचित बहुजन आघाडीचे जुने कार्यकर्ते आणि जिल्हाध्यक्ष असतानाही आपल्याला विश्वासात न घेता दिलीप खेडकर यांना उमेदवारी देऊन काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाशी गद्दारी केल्याचा आरोप बोरसे यांनी या वेळी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हा सर्व प्रकार पक्षाचे सर्व डॉ. प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar यांच्याकडे आपण तक्रार करणार असल्याचं त्यांनी सांगितले, तर वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी बहुजन आघाडीच्या वतीने आपण उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचं दिलीप खेडकर यांनी सांगितले आहे.

Edited By : Umesh Bambare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT