Shantigiri Maharaj  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shantigiri Maharaj News : उमेदवारी अर्ज बाद तरीही शांतिगिरी महाराज रिंगणात, नेमकं घडलं काय ?

Nashik Loksaha : शांतिगिरी महाराज यांनी सोमवारी आपल्या भक्त आणि अनुयायांसह मिरवणूक काढून शक्ती प्रदर्शन केले होते. यावेळी राज्यभरातील हजारो भक्त त्यांच्या रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी शांतिगिरी महाराज यांनी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

Sampat Devgire

Shantigiri Maharaj News : नाशिक मतदारसंघातील उमेदवारांच्या अर्ज छाननीत शांतिगिरी महाराज यांचा अर्ज बाद झाला. कायदेशीर कागदपत्र नसल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा हा अर्ज बाद केला. शांतिगिरी महाराज यांना मात्र ही प्रक्रिया अपेक्षित होती. कारण त्यांनी उमेदवारीचे दोन अर्ज दाखल केले होते. एक अपक्ष म्हणून आणि एक शिंदे गटाचे shinde group उमेदवार म्हणून. मात्र, शिंदे गटाने त्यांना एबी फाॅर्म दिलेला नाही. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद होण्याची शक्यता होती.

शांतिगिरी महाराज Shantigiri Maharaj यांनी सोमवारी आपल्या भक्त आणि अनुयायांसह मिरवणूक काढून शक्ती प्रदर्शन केले होते. यावेळी राज्यभरातील हजारो भक्त त्यांच्या रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी शांतिगिरी महाराज यांनी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या अर्जासोबत पक्षाचा एबी फॉर्म जोडलेला नव्हता. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना लिखित पत्र देऊन तीन एप्रिल पर्यंत एबी फॉर्म सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. या मुदतीत एबी फॉर्म जोडता न आल्याने आज (शनिवारी) झालेल्या छाननीत त्यांचा अर्ज बाद ठरला. निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांनी त्याची माहिती जाहीर केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान शिंदे गटाचा Shinde group उमेदवार म्हणून त्यांचा अर्ज बाद झाला आहे. अपक्ष उमेदवार म्हणून त्यांचा अर्ज कायम आहे. त्यामुळे आपल्या निवडणूक लढविण्याचा निर्धार कायम असून मतदारसंघात शेकडो आणि अनुयायी प्रचारात व्यस्त असल्याचे त्यांनी सांगितले. आता आपली निवडणूक अधिक सोपी होणार आहे. राजकीय पक्षांनी उमेदवारी दिली नसल्याने त्यांचे कोणतेही बंधन आपल्यावर नाही. सर्व पक्षांचे अनुयायी आता माझ्या प्रचारात सक्रिय होतील, असा दावाही शांतिगिरी महाराज यांनी केला.

दरम्यान आज झालेल्या छाननी प्रक्रियेत दिंडोरी लोकसभा मतदार संघातील एमआयएमचे उमेदवार खान गाझी यांच्यासह माकपचे डमी उमेदवार सुभाष चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या डमी उमेदवार पल्लवी भगरे, माजी आमदार संजय चव्हाण, अपक्ष उमेदवार वाटणे यांचे अर्ज बाद झाले आहेत.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT