uddhav thackeray sudhakar badgujar dada bhuse  sarkarnma
उत्तर महाराष्ट्र

Nashik Politics : दादा भुसेंनी लक्ष्य केलेल्या सुधाकर बडगुजरांवर ठाकरे गटात मोठी जबाबदारी

Sampat Devgire

आगामी लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024 ) पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने ( Shivsena Uddhav Thackeray Group ) पक्ष संघटनेत फेरबदल केले आहेत. पालकमंत्री दादा भुसे ( Dada Bhuse ) यांनी राजकीयदृष्ट्या लक्ष्य केलेल्या सुधाकर बडगुजर यांना जिल्हाप्रमुखपदी बढती देण्यात आली आहे. ( Sudhakar Badgujar Latest News )

एकीकडे लोकसभा निवडणुकीची उत्साहात तयारी करणाऱ्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने संघटनात्मक फेरबदल केले आहेत. आगामी निवडणुकीत अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी संघटनात्मक बदल केल्याचा दावा वरिष्ठ सूत्रांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्हा आणि शहर पातळीवर पदाधिकाऱ्यांचे खांदेपालट झाली आहे. महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांना जिल्हाप्रमुखपदी बढती देण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून चर्चेत असलेल्या आणि सध्या जिल्हाप्रमुख असलेल्या विजय करंजकर यांना नाशिक लोकसभा मतदारसंघाचे संघटक करण्यात आले आहे. महानगरप्रमुखपदी माजी नगरसेवक विलास शिंदे यांची नियुक्ती झाली आहे.

शिवसेनेने सध्या लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. महाविकास आघाडीकडून जागावाटपाची चर्चा सुरू आहे. यासंदर्भात नाशिक लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला मिळणार असे स्पष्ट संकेत आहेत. त्यादृष्टीने शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी तयारीसाठी एक दौरादेखील केला आहे. यामध्ये जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांची संभाव्य उमेदवार म्हणून चर्चा आहे. त्यादृष्टीने पदाधिकाऱ्यांत झालेली खांदेपालट निवडणुकीच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकेल. त्याचा निवडणुकीच्या नियोजनाला लाभ होईल, असा दावा केला जात आहे.

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील ठाकरे सरकार कोसळले होते. भाजपबरोबर जात शिंदे हे मुख्यमंत्री झाले. मात्र, मूळ शिवसेनेतून फारसे पदाधिकारी शिंदे गटात गेले नव्हते. या पार्श्वभूमीवर महापालिकेतील सत्तेच्या माध्यमातून काही माजी नगरसेवकांना गळाला लावण्यात शिंदे गट यशस्वी झाला होता.

ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना शिंदे गटात सामावून घेण्यासाठी विविध प्रयत्न झाले. पण, पदाधिकारी ठाकरे गटात ठाम राहिले. उद्धव ठाकरे गट आजही प्रबळ आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात लढत होण्याचे संकेत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने केलेले संघटनात्मक बदल चर्चेत आहेत.

( Edited By : Akshay Sabale )

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT