AAP, BJP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

AAP News : लोकसभा निवडणुकीत भाजपला विरोध हेच 'आप'चे 'लक्ष'

Arvind Jadhav

AAP News : राज्यात लोकसभेच्या रणधुमाळीत 'आप' (आम आदमी पार्टी) उतरणार की नाही, हे स्पष्ट नाही. मात्र, धार्मिक व जातीपातीचे राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला विरोध करणे हे आम आदमी पार्टीचे लोकसभेतील पहिले लक्ष आहे. इंडिया आघाडी म्हणून देशपातळीवर एकत्र आलो आहोत. राज्यात 'आप'लाही जागा मिळू शकतात. त्यादृष्टीने तयारी असल्याची माहिती 'आप'चे राज्य उपाध्यक्ष धनजंय शिंदे यांनी दिली.

दिल्ली आणि पंजाबवर कब्जा केल्यानंतर 'आप'ने आपला मोर्चा इतर राज्यांकडे वळवला आहे. गत विधानसभा निवडणुकीमध्ये गुजरात राज्यात मैदानात उतरली होती. मात्र, पक्षाला तितका जनाधार मिळाला नाही. आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून तयारी केली जाते आहे. याबाबत बेलताना शिंदे यांनी सांगितले की, आप इंडिया आघाडीसोबत आहे.

दिल्ली आणि पंजाबमध्ये आपची सत्ता असून, गत निवडणुकीमध्ये गोवा आणि गुजरात राज्यात आपला चांगली मते मिळाली आहे. महाराष्ट्रातही आपची ताकद वाढत आहे. संघटना वाढत असल्याने आप इंडिया आघाडीकडे जागांची मागणी करत आहे. त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. राज्य पातळीवरून आम्ही तसा प्रस्ताव पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्याकडे सादर केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता जागा मिळेल काय, किती जागा मिळतील याबाबत चर्चा करण्यातून काहीच हासील नाही. जो निर्णय येईल तो आम्हाला मान्य असेल. मात्र, राज्यात आपची सर्व ताकद भाजपा विरोधात असणार आहे. इंडिया आघाडीचे जे उमेदवार असतील त्यांच्यासाठी आपचे कार्यकर्ते मैदानात उतरतील.

भाजपाने धार्मिक धुव्रीकरण आणि जातीपातीचे राजकारण करून समाजात फुट पाडण्याचे काम चालवले आहे. बेरोजगारी, शिक्षक भरती, इतर नोकऱ्यांच्या मध्ये झालेले भ्रष्टाचार, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती असे अनेक प्रश्न आहे. मात्र, याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून भाजपा सत्तेच्या जोरावर पुढे चालले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मोदी शहांच्या हातातील कटपुतळे आहेत. त्यामुळे विकासाला खिळ बसली असून, याचा मोठा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीच्या मतदानातून दिसून येईल, असा दावा शिंदे यांनी केला. आपची संघटनात्मक ताकद वाढत असल्याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT