Internal Rift in BJP Over Mayor Post Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Tapovan tree cutting: तपोवनातील वृक्षतोड होणारच! गिरीश महाजनांनी हैदराबादमध्ये जाऊन खरेदी केली 15 हजार झाडे

Tapovan deforestation News : नाशिक शहरातील तपोवन येथे 2027-28 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. त्यासाठी प्रशासन आतापासूनच कामाला लागले आहे. सध्या या परिसरात साधूग्राम उभारण्याचे काम सुरू आहे.

सरकारनामा ब्युरो

Nashik News : नाशिकमध्ये येत्या काळात होत असलेल्या कुंभमेळ्याची जोरात तयारी सुरु आहे. या परिसरात होत असलेल्या कुंभमेळ्यासाठी तपोवन परिसरात उभारण्यात येणाऱ्या 'साधूग्राम' प्रकल्पासाठी होता असलेल्या वृक्षतोड मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे. या परिसरातील सुमारे 1700 ते 1800 झाडांचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी वृक्षतोडीच्या बाजूने भूमिका कायम ठेवली आहे, परंतु सोबतच पर्यावरण संवर्धनाची ग्वाही त्यांनी दिली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी या वादावर तोडगा काढताना हैदराबादमध्ये जाऊन 15 हजार झाडे खरेदी केली आहेत.

नाशिक शहरातील तपोवन येथे 2027-28 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. त्यासाठी प्रशासन आतापासूनच कामाला लागले आहे. सध्या या परिसरात साधूग्राम उभारण्याचे काम सुरू आहे. याच विकासकामांसाठी झाडे काढावी लागणार आहेत. तोड नव्हे तर पुनर्रोपण करण्यात येत आहे. मंत्री महाजन यांच्या म्हणण्यानुसार, सर्व जुनी झाडे तोडली जाणार नाहीत. जी झाडे 10 वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत, त्यांचे इतरत्र पुनर्रोपण केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पर्यावरणप्रेमींच्या विरोधामुळे मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केले आहे की, तोडण्यात येणाऱ्या एका झाडाच्या बदल्यात दहा नव्हे तर पंधरा नवीन झाडे लावली जातील. येत्या काळात 15 हजार झाडांची लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 1000 ते 1800 झाडे काढण्याच्या बदल्यात नाशिक शहरात 15,000 नवीन झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

येत्या काळात तपोवनातील या 15 हजार नवीन झाडांसाठी मंत्री महाजन यांनी हैदराबाद येथून 15 फूट उंचीची मोठी आणि देशी प्रजातीची झाडे खरेदी केली आहेत. त्यामध्ये वड, पिंपळ, जांभुळाची झाडे आहेत. तर दुसरीकडे मोठ्या उंचीची झाडे लावल्याने त्यांचा जगण्याचा दर जास्त असेल, असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे येत्या याकाळात होत असलेल्या या वृक्ष लागवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वृक्षतोड होणार आहे याचा अर्थ आम्ही वृक्षतोडण्याच्या मागे लागलो आहोत असे समजायचे काही कारण नाही. हजार झाडे तोडल्यावर आम्ही पंधरा हजार झाडे लावणार आहोत. त्यामुळे उलट शहराच्या हरित आच्छादनात वाढच होईल, असेही मंत्री गिरीश महाजन यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT