Uddhav Thackeray, Raj Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Uddhav Thackeray : अखेर उद्धव यांनी राज ठाकरेंना दणका दिलाच; मनसेच्या उमेदवाराची शिवसेनेसाठी माघार

Political News : नांदगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या गणेश धात्रक यांना मनसेच्या उमेदवाराने पाठिंबा दिला. मनसेच्या उमेदवारांनी माघार घेऊन शिवसेना ठाकरे पक्षाला पाठिंबा दिल्याने चर्चा जोरात रंगली आहे.

Sampat Devgire

Nashik News : नांदगाव विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी राज ठाकरे यांना दुसरा धक्का बसला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतच मनसेच्या उमेदवाराने शिवसेनेला पाठिंबा दिला. मनसेच्या उमेदवाराने निवडणूक रिंगणातून माघार घेतली असल्याने येत्या काळात येथील समीकरण बदलणार आहे. ऐन निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली असताना मनसेच्या उमेदवारांनी माघार घेऊन शिवसेना ठाकरे पक्षाला पाठिंबा दिल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी नांदगाव मतदारसंघात मनमाड येथे जाहीर सभा झाली. महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी झालेल्या या सभेत नाट्यमय वळण मिळाले. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार गणेश धात्रक यांच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराने पाठिंबा जाहीर केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) उमेदवार अकबर सोनावाला यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली. शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांच्या व्यासपीठावर जाऊन त्यांनी आपल्या पाठिंबा शिवसेना ठाकरे पक्षाला जाहीर केला.

मनसेच्या पाठिंब्याने शिवसेनेचे (Shivsena) उमेदवार धात्रक यांची स्थिती आता मजबूत झाली आहे. मनमाड येथे झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी आणि शिवसेना शिंदे गटावर गंभीर टीका केली. राज्यात सध्या महायुती सरकार काम करीत आहे. हे सरकार महाराष्ट्राला गुजरातच्या चरणी अर्पण करण्याचे काम करीत आहे. महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमान गहाण ठेवून काम करणाऱ्या महायुती सरकारला जनता धडा शिकवणार आहे.

या सरकारचे अस्तित्व आता संपले आहे. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेत येणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर महाराष्ट्राचा स्वाभिमान कोणत्याही परिस्थितीत कमी होऊ दिला जाणार नाही. सध्या महाराष्ट्रातील युवकांचे हक्काचे रोजगार, शेतकऱ्यांचे अधिकार, पिकांची परिस्थिती सगळे काही वाऱ्यावर सोडल्यासारखी स्थिती आहे. राज्यातील सरकारला फक्त आणि फक्त गुजरातच्या हिताची काळजी आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील नेत्यांना एवढा रस का? असा प्रश्न ठाकरे यांनी केला.

नांदगाव विधानसभा मतदारसंघात सध्या चौरंगी लढत आहे. येथे शिवसेना ठाकरे पक्षाकडून गणेश धात्रक तर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून विद्यमान आमदार सुहास कांदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते माजी खासदार समीर भुजबळ यांनी पक्षाचा राजीनामा देऊन अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. मराठा महासंघाने येथे डॉ. रोहन बोरसे यांना पुरस्कृत केले आहे. डॉ. बोरसे हे या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांना मिळणाऱ्या मतांवर नांदगाव मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT