Anil Deshmukh  Sarkarnama
विदर्भ

Anil Deshmukh : 'तुम्ही दगड मारा नाहीतर गोळ्या झाडा अनिल देशमुख मरणार नाही आणि..' ; भाजपला इशारा !

Anil Deshmukh’s bold warning to BJP ‘I won’t die नरखेड तालुक्यातून सोमवारी रात्री प्रचार सभा आटोपून परत असताना देशमुखांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती.

Rajesh Charpe

Nagpur News: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी रात्री प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. एक दगड त्यांच्या डोक्यावर लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. जखमी झालेल्या देशमुखांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. रूग्णालयातून सुटी होताच त्यांनी थेट भाजपवर हल्लाबोल केला. 'तुम्ही दगड मारा किंवा गोळ्या झाडा अनिल देशमुख मरणार नाही आणि तुम्हाला सोडणारही नाही.' असा इशारा त्यांनी दिला.

नरखेड तालुक्यातून सोमवारी रात्री प्रचार सभा आटोपून परत असताना अनिल देशमुखांच्या (Anil Deshmukh) गाडीवर दगडफेक करण्यात आली होती. यात त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या आणि एक दगड थेट त्यांच्या डोक्यावर येऊन आदळला होता. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना तातडीने नरखडेच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले होते.

मोठा रक्तस्राव होत असल्याने त्यांना तातडीने नागपूर येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सायंकाळी त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली. भाजपच्याच कार्यकर्त्यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, तुम्ही कितीही दगड मारले किंवा गोळ्या झाड्याला तरी मी मरणार नाही असे ते यावेळी म्हणाले.

काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघात यावेळी अनिल देशमुख उमेदवार नाहीत. त्यांच्या ऐवजी त्यांचे चिरंजीव सलील देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारी दिली आहे. भाजपचे (BJP) चरणसिंग ठाकूर आणि काँग्रेसचे बंडखोर याज्ञवल्क्य जिचकार असा तिहेरी सामना येथे रंगला आहे.

अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद काटोल विधानसभा मतदारसंघात पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या मतदारसंघात अतिशय चुरशीचा समाना होऊ घातला आहे.

या दडफेकीवरून राष्ट्रवादी (NCP) व भाजपचे कार्यकर्ते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहे. अनिल देशमुख यांचा हा निवडणूक स्टंट असल्याचा भाजपचा आरोप आहे. दगडफेक किंवा हल्ले करणारे घोषणाबाजी करीत नाहीत असे भाजपच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. पराभव समोर दिसत असल्याने मतदारांची सहानुभूती मिळवण्यासाठी देशमुखांनी स्वतः हा हल्ला घडवून आणला असल्याचा भाजपचा आरोप आहे.


(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT