Nagpur News : राज्यातील कोणत्या ना कोणत्या मंत्र्याचे रोजच भ्रष्टाचार पुराव्यनिशी बाहेर येत आहेत. त्यांच्या व्हिडिओ बाहेर येत आहेत, पैशांच्या थप्प्या बाहेर येत आहेत, तरी सुद्धा मुख्यमंत्री व प्रशासन ढिम्म आहे, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी अजून एक खाते निर्माण केले पाहिजे, त्याचं नाव पाघरुण मंत्री ठेवायला पाहिजे. म्हणजे बाकीचे जे मंत्री आहे ते पांघरुण बघून हातपाय पसरतील. तर मुख्यमंत्री त्यावर पांघरुण घालतील. इतर खात्याच्या बरोबरीनं पांघरुण खातं तयार करावे आणि त्याचा चार्ज स्वता घ्यावा. मला मुख्यमंत्र्यांची दया येते, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सीएम फडणवीसांच्या कारभारावर ताशेरे ओढले.
नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधिमंडळ पक्ष कार्यालयातच उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत. राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. यावेळी ठाकरे यांचं शिवसेनेचे (Shivsena) युवा नेते आदित्य ठाकरे, सुनील राऊत यांच्यासह शिवसेनेचे नेते उपस्थित होते.
भाजपने वंदेमातरमवर संसदेत चर्चा घडवून आणली आहे. त्यांच्या चर्चेवरही उद्धव ठाकरे यांनी तोफ डागली आहे. भाजपने (BJP) आपल्याला हिंदुत्व शिकवण्याच्या फंद्यात पडू नये. त्यांना वंदे मातरम आता आठवले आहे. एखाद्या देशात राष्ट्रगीतावर चर्चा कशी काय होऊ शकते ? इतक्या वर्षात भाजपला का आठवले नाही असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन अर्ध्यावर आले आहे, उद्या संपणार की रविवारी संपणार ते आज किंवा उद्या ठरेल. नागपूरमध्ये विधिमंडळाचं अधिवेशन विदर्भासाठी आणि महाराष्ट्रासाठी घेतलं जातं. अधिवेशन मध्यावर आलं आहे. विदर्भासाठी या अधिवेशनात काय दिले गेलं हा प्रश्न विचारात घेतला पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रावर कधी नव्हे ती मोठी आपत्ती अतिवृष्टीच्या निमित्तानं कोसळली. शेतकऱ्यांची घरं दारं, विद्यार्थ्यांची पुस्तकं खराब झाली. पीक खरडून गेली, शेतजमीन वाहून गेली. मुख्यमंत्र्यांनी भलंमोठं पॅकेज असा गोंडस शब्द देऊन एक रक्कम घोषित केली. त्या पॅकेजचं पुढं काय झालं, की त्याचं ठिबक सिंचन काय झालं कळायला मार्ग नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
शिवराजसिंह चौहान यांनी बिंग फोडले
पहिला अर्थसंकल्प येतो, मागण्या, पुरवण्या मागण्या, 75 हजार कोटींच्या मागण्या, राज्यावर 9 लाख कोटींचं कर्ज आहे ते बघतो आहोत. गेल्या महिन्याच्या अखेरीस केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं की महाराष्ट्राकडून आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी कोणताही प्रस्ताव आला नाही. राज्य सरकारच्या कारभाराचे बिंग त्यांनी फोडल्यानंतर घाई घाईने शेवटच्या आठवड्यात प्रस्ताव पाठवल्याचे जाहीर करण्यात आले, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी यावेळी पत्रकार परिषदेत केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.