bachu kadu   sarkarnama
विदर्भ

Cricketnama 2023 : शिंदे गटाचा ‘प्रहार’ ; बच्चू कडूही 'झिरो'वर परतले 

Shiv Sena Wins : आक्रमक फलंदाजीसह उत्कृष्ट गोलंदाजीने मिळवलं यश

प्रसन्न जकाते

Shiv Sena Shinde Riders Vs Prahar Fighters : पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी (नागपूर) :  शिवसेना एकनाथ शिंदे गटातील फलंदाजांची उत्कृष्ट खेळी आणि आक्रमक गोलंदाजीचा ‘प्रहार’ आमदार बच्चू कडू यांचा संघ सहन करू शकला नाही. त्यामुळे ‘क्रिकेटनामा’च्या सामन्यात कडू यांच्या संघावर शिंदे गटाने विजय मिळविला. आमदार कडू यांनाही शून्य धावेवर ‘पॅव्हेलियनम’मध्ये परतावे लागले. विधान परिषद सदस्य मनिषा कायंदे, ‘सरकारनामा’चे संपादक ज्ञानेश सावंत, विभागीय वरिष्ठ प्रतिनिधी अतुल मेहेरे यांच्या उपस्थितीत प्रहारने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला.

मेकोसाबाग परिसरात असलेल्या पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी, मेथोडीस्ट हायस्कूलच्या प्ले-ग्राऊंड, श्यालोम स्पोर्ट्स ग्राऊंड परिसरात ‘क्रिकेटनामा’चे सोमवारी (ता. 11) थाटात उद‌्घाटन झाले. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार स्वागताध्यक्ष व माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके निमंत्रक असलेल्या या स्पर्धेचा चौथा सामना शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि प्रहार यांच्यात झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सामन्याला सुरुवात झाल्यानंतर शिंदे गटाकडून पुरुषोत्तम जाधव आणि मन्नु जोहर ‘फिल्ड’वर उतरले. रमेश यांनी पहिलाच चेंडू डॉट केला. मात्र त्यानंतर लगेचच जोहर हे त्रिफळाचित झाले. अमनदीप खालसा त्यानंतर मैदानावर आले. अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी दुसऱ्या षटकाच्या गोलंदाजीला सुरुवात केल्यानंतर पुरुषोत्तम यांनी षटकार व चौकार लगावले. बच्चू कडू यांनी 21 धावा दिल्या. या षटकात झेलही सुटली व ‘ओव्हर थ्रो’ देखील झाला. त्यामुळे शिंदे गट दोन षटकांत 29 धावांवर पोहोचला.

नकुल राठोड यांनी तिसऱ्या षटकात धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न तर केलाच शिवाय अमनदीप खालसा यांची विकेट ही घेतली. नवीन फलंदाज मिलिंद देशमुख यांना त्यानंतर डॉट बॉल टाकले. रमेश यांनी पुन्हा चौथ्या षटकात शिंदे गटाला तीन चेंडूवर धावा काढू दिली नाही आणि पुरूषोत्तम यांना झेल बाद ही केले. पुरुषोत्तम यांच्यानंतर शिंदे गटाकडून लड्डू पाजी आले त्यांनी येताच षटकार टोलवला.

प्रहारच्यावतीनं शेवटच पाचवे षटक अनिल गावंडे यांनी टाकण्यास सुरुवात केली आणि पहिल्याच चेंडूत त्यांनी मिलिंद देशमुख यांना त्रिफळाचित केले. मैदानावर आलेल्या प्रहारच्या तुषार दलाल यांनी मैदान मारण्याचा प्रयत्न केला. लड्डू पाजी यांनी त्यांनी षटकार लगावला. मात्र पाच षटके संपल्यानंतर प्रहारची धावसंख्या चार बाद 62 धावा झाली होती.

धावांचे लक्ष्य गाठताना प्रहारची दमछाक झाली. शिंदे गटाच्या मन्नु जोहर यांनी पहिलं षटक ‘मेडन’ टाकलं. शिंदे गटाच्या धीरज आणि राजकुमार पटेल यांना एकही धाव काढता आली नाही. त्यानंतर अमन खालसा यांनी शिंदे गटाकडून गोलंदाजी केली. तोपर्यंत प्रहार शून्य धावांवर होती. अमन यांच्या तिसऱ्या चेंडूवर धीरज यांनी दोन धावा मिळवत संघाचे खातं उघडलं. तोपर्यंत दोन षटके समाप्त झाली होती.

तुषार दलाल यांनी फलंदाजी सोबतच उत्कृष्ट गोलंदाजीही केली. त्यांनी राजकुमार पटेल यांना बाद केले. त्यानंतर प्रहार कडून वैभव खोडे मैदानावर आलेत. त्यानंतर त्यांनी पुन्हा वैभव यांना त्रिफळाचित केले. आमदार बच्चू कडून हे देखील येताच त्रिफळाचित झालेत. त्यानंतर दीपक यांनी प्रहार संघाकडून मैदानावर आल्यानंतर लड्डु पाजी यांच्या चेंडूंवर फटके मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी क्षेत्ररक्षणात चूक झाल्याने हे षटक महाग ठरले.  चौथे षटक संपले  त्यावेळी प्रहारला सहा चेंडूत 29 धावांची गरज होती.

अखेरचं षटक अमन खालसा यांनी टाकलं. त्यावेळी धीरज आणि दीपक यांनी विजयासाठी संघर्ष केला. परंतु त्यांना यश आलं नाही. शिंदे गटाचा 8 धावांनी विजय झाला. सकाळचे (मुंबई) संपादक राहुल गडपाले यांच्या हस्ते सामना विराचा पुरस्कार तुषार दलाल यांना प्रदान करण्यात आला. ‘सरकारनामा’चे संपादक ज्ञानेश सावंत यावेळी उपस्थित होते. नीलेश नातू यांनी सामन्याचं सूत्रसंचालन व समालोचन केलं.

मैदानावरही जोरदार बॅटिंग

क्रिकेट सर्वांच्याच आवडीचा खेळ आहे. जगभरात या खेळाचे मोठ्याप्रमाणावर चाहते आहेत. विश्वचषकाचा जोश सर्वांनी पाहिला. पण ‘क्रिकेटनामा’चा जोशही त्यापेक्षा कमी नाही, असं यावेळी आमदार मनिषा कायंदे यावेळी म्हणाले. एकनाथ शिंदे गट विधिमंडळात जोरदार बॅटिंग करीत आहे. क्रिकेटच्या मैदानावर ही संघ जोरदार बॅटिंग करेल असं कायंदे म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT