Anil Deshmukh, Ashish Deshmukh, Devendra Fadnavis  sarkarnama
विदर्भ

Anil Deshmukh News : उपमुख्यमंत्र्यांसमोर काका-पुतण्या भिडले, अनिल देशमुखांनी भाषण थांबवलं...

Ashish Deshmukh : आशिष देशमुख यांनी ते काटोलचे आमदार होते तेव्हा कसा विकास झाला हे सांगितले. आता विकास होत नसल्याचा दावादेखील त्यांनी केला. याला अनिल देशमुख यांनी प्रत्युत्तर दिले.

Roshan More

Nagpur : महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या काका-पुतण्याचा वाद विदर्भातदेखील पाहण्यास मिळाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित होत असलेल्या शासकीय कार्यक्रमात अनिल देशमुख-आशिष देशमुख काका-पुतण्या भिडले. अनिल देशमुख यांनी भाषण केले असतानादेखील आशिष देशमुख यांना प्रत्युत्तर देण्यासाठी ते पुन्हा भाषण करण्यास उभे राहिले. काटोल नगरपरिषदच्या विकासकामाचे भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान हा गोंधळ झाला. भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याने अनिल देशमुख यांना आपले भाषण थांबवावे लागले.

राष्ट्रवादीचे नेते राहुल देशमुख यांनी त्यांना भाषण करून देण्याची विनंती केली. राहुल देशमुख यांनी आपल्या भाषणात भाजपवर टीका केली. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले. देशमुख आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले. आशिष देशमुख (Ashish deshmukh) यांनी आपल्या भाषणात काटोल मतदारसंघाच्या विकासावरून थेट अनिल देशमुख यांना टार्गेट केले. त्यामुळे भाषण झालेले असतानादेखील अनिल देशमुख (Anil Deshmukh ) हे भाषण करण्यास पुन्हा उभे राहिले.

मग पळून का गेला...

आशिष देशमुख यांनी ते काटोलचे आमदार होते तेव्हा कसा विकास झाले हे सांगितले. आता विकास होत नसल्याचा दावादेखील त्यांनी केला. याला अनिल देशमुख यांनी प्रत्युत्तर दिले. मी एक शब्द राजकीय बोललो नाही. मात्र, आशिष देशमुख बोलले. हा राजकीय कार्यक्रम नाही. 2014 ला काटोलमधून निवडूण आला तर मग 2019 ला का पळून गेला, असा टोला अनिल देशमुख यांनी आशिष देशमुख यांना लगावला.

कार्यकर्ते भिडले

राहुल देशमुख यांनी आपल्या भाषणात भाजपवर टीका केली. विकासकामांचे श्रेय भाजप लाटत असल्याचा आरोप केला. त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्याने राहुल देशमुख यांनी आपले भाषण थांबवले. या कार्यक्रमात देशमुख यांचे कार्यकर्तेदेखील आक्रमक झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT