Vidarbh Protest News Sarkarnama
विदर्भ

Vidarbh Protest : वेगळ्या विदर्भासाठीच्या बेमुदत आंदोलनाकडे प्रशासनाची पाठ, पदाधिकाऱ्यांची प्रकृती खालावली

Vidarbha Rajya Aandolan : विदर्भ राज्य आंदोलन समितीचे बुलडाण्यात बेमुदत उपोषण!

जयेश विनायकराव गावंडे

Buldhana News : बुलडाणा, वेगळ्या विदर्भासाठीचा मुद्दा पुन्हा तापला आहे. वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी बुलडाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे. आज चवथ्या दिवशी आंदोलनकर्त्यांकडून आंदोलन सुरूच होतं. ऐन थंडीत सुरू असलेल्या या आंदोलनात उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असून जिल्हाध्यक्षांना रक्तदाबाचा त्रास जाणवत आहे. तर या आंदोलनाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.

वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा विदर्भ राज्य आंदोलन समिती आक्रमक झाली आहे. विदर्भासाठीची चळवळ पुन्हा तीव्र झाली आहे. बुलडाण्यात (Buldhana) हे आंदोलन करण्यात येत आहे. विदर्भ राज्याची निर्मिती करण्यात यावी, वीज दरवाढ मागे घेण्यात यावी, कृषी पंपाना दिवसा वीजपुरवठा, जालना खामगाव रेल्वे मार्ग मंजूर करून राज्याने ५० टक्के निधी वाटा द्यावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत, अन्नधान्यावरील जीएसटी रद्द करावा या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

या आंदोलनात(Protest) विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा प्रदेशाध्यक्ष मुकेश मासुरकर, जिल्हाध्यक्ष सुरेश वानखेडे, राम बारोटे, तेजराव मुंडे, प्रकाश अवसरमोल, कैलास फाटे, जनार्दन इंगळे, रविकांत आढाव, राजेंद्र पवार हे २७ डिसेंबर पासून उपोषणाला बसले आहे. त्यांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. आज चौथ्या दिवशी (दि. ३०) उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे.

समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश वानखेडे यांना रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्याचे आंदोलनस्थळी सांगण्यात आले. चौथा दिवस उलटल्यावरही प्रशासनातर्फे कोणत्याही अधिकाऱ्याने आंदोलकांची भेट घेतली नसल्याचे चित्र आहे. यामुळे विविध संघटना, राजकीय पक्षांनी भेटी देत पाठींबा दिला. मात्र, अपवाद वगळता साठी गाठलेल्या आंदोलकांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.

तर स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी अनेक वर्षे जुनी आहे. ज्यांची मागणी नव्हती अशी राज्ये निर्माण झाली आहेत. मात्र, स्वतंत्र राज्याची मागणी असूनही विदर्भाला उपेक्षित ठेवण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.(Vidarbha)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तर स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी अनेक वर्षे जुनी आहे. ज्यांची मागणी नव्हती अशी राज्ये निर्माण झाली आहेत. मात्र, स्वतंत्र राज्याची मागणी असूनही विदर्भाला उपेक्षित ठेवण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT