Navneet Rana  Sarkarnama
विदर्भ

Navneet Rana News : अमरावतीमधून भाजपच्या तिकिटावर लोकसभा लढवणार का?; नवनीत राणांनी दिले हे उत्तर...

Vijaykumar Dudhale

Amravati News : ‘मी सध्या तरी युवा स्वाभिमानी पक्षाची खासदार आहे, पुढचं पुढं बघू,’ असे सांगत लोकसभेची आगामी निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर लढण्याबाबत खासदार नवनीत राणा यांनी मौन बाळगले. (Will Lok Sabha contest on BJP ticket from Amravati?; Navneet Rana gave this answer...)

महाविकास आघाडी सरकारच्या काळात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. तेव्हापासून राणा कुटुंबीय हे भाजपच्या सोबत गेल्याचे दिसून येत होते. सत्ता असो अथवा नसो आपण कायम देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राहिलो आहोत. यापुढेही फडणवीस यांनाच साथ देणार असल्याचे आमदार रवी राणा यांनी सांगितले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार रवी राणा आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्या वादामध्येही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली होती. तसेच दोघांनाही सामंजस्याची भूमिका घेण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे राणा कुटुंबीय हे आगामी निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढेल, अशी चर्चा रंगली होती. मात्र, आज याबाबत खासदार नवनीत राणा यांना विचारले असता, त्यांनी त्यावर बोलणेच टाळले. आपण स्वाभिमानी पक्षाची खासदार आहोत, पुढचं पुढं बघू, असे सांगत त्यांनी भाजपलाही गृहीत न धरण्याचा इशारा दिला आहे का, अशी चर्चा रंगली आहे.

दरम्यान, मी लढणारी आहे. कोणी सत्तेवर आहे किंवा सत्तेच्या बाहेर आहे; म्हणून नवनीत राणा आणि रवी राणा काम करत नाही. आम्ही नेहमी लढून लोकांना न्याय देण्याचे काम करत आहोत, असे खासदार नवनीत राणा यांनी सांगून मी पहिल्यांदाच खासदार झालेली आहे. आमचा एक स्वतंत्र पक्ष आहे. आम्ही त्या पक्षाकडून निवडून आलो आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

खासदार राणा म्हणाल्या की, जे संकट महाराष्ट्रावर होते, ते दूर व्हावं यासाठी मी हनुमान चालिसा पठण केले होते. महाराष्ट्रावरील संकट दूर होऊन सरकार शेतकऱ्यांना मदत करत आहे. जे प्रश्न आम्ही त्यांच्यापुढे मांडत आहोत, ते सोडविले जात आहेत. आताचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घरात बसणारे नाहीत. घराबाहेर पडून लोकांना मदत करणारे आहेत.

उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्रावरील संकट होते

उद्धव ठाकरे त्यावेळी महाराष्ट्रावर संकट होते. स्वतः घरात बसून ज्यांनी अडीच वर्षे महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडलं, ते महाराष्ट्रासाठी संकटच होते, अशी टीकाही राणा यांनी पुन्हा एकदा केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT