Food Excellence Center : अजित पवार खोटे बोलत आहेत; शासन परिपत्रक दाखवत राष्ट्रवादीच्या युवा नेत्याचा हल्लाबोल

Solapur Politics : श्री अन्न उत्कृष्टता केंद्र हे बारामती येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट येथे स्थापन करणार असल्याचे त्यात म्हटले आहे.
Prashant Babar-Ajit Pawar
Prashant Babar-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : सोलापूर येथील श्री अन्न उत्कृष्टता केंद्रावरून उपमुख्यमंत्री अजित पवार धादांत खोट बोलत आहेत. कारण राज्य सरकारने २४ नोव्हेंबर रोजी शासन परिपत्रक काढून हे केंद्र बारामतीत होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे अजितदादांनी ‘हे शासन परिपत्रक खोटे आहे किंवा मी तरी खोटे बोलत आहे, हे जाहीर करावे, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे युवा नेते प्रशांत बाबर यांनी उपमुख्यमंत्र्यांना दिले आहे. (Ajit Pawar is lying about Center of Food Excellence: Prashant Babar)

सोलापूर येथील श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामती येथे हलविण्यात आले आहे, असा आरोप दोन दिवसांपूर्वी सरकारमधील भाजपच्या आमदारांनी, तसेच शरद पवार गटाचे प्रशांत बाबर यांनी केला होता. त्याची सोलापुरात तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. दक्षिण सोलापूरचे भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Prashant Babar-Ajit Pawar
Konkan News : राणे-केसरकर 12 वर्षांनंतर भेटले; भेटीनंतर म्हणाले ‘आमच्यात वैयक्तिक संघर्ष कधीच नव्हता...’

बारामती येथे रविवारी माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूरचा कोणताही प्रकल्प बारामतीला नेला जाणार नाही. अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापुरातच होणार आहे, असे स्पष्ट केले होते. बारामतीत होऊ घातलेला प्रकल्प हा वेगळा आहे, त्याचा सोलापूरशी संबंध नाही. अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापुरातच होणार आहे, असे जाहीर केले होते.

Prashant Babar-Ajit Pawar
Dispute In BJP : ‘आमच्या घरात येऊन अमित शाहांनी माझा घात केला’; भाजपच्या माजी मंत्र्याची खदखद बाहेर...

शरद पवार गटाचे युवा नेते प्रशांत बाबर यांनी मात्र शासन परिपत्रक दाखवत अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला मंजूर केल्याचे पत्रकच वाचून दाखवले. श्री अन्न उत्कृष्टता केंद्र हे बारामती येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट येथे स्थापन करणार असल्याचे त्यात म्हटले आहे. त्यामुळे हे परिपत्रक तर खोटे आहे किंवा अजित पवार यांनी आपण खोटे बोलत आहोत, हे पुढे येऊन सांगावे, असेही आव्हान बाबर यांनी दिले आहे.

Prashant Babar-Ajit Pawar
Bidri Sugar Factory Election : ‘बिद्री’च्या निवडणुकीत विधानसभेची रंगीत तालीम; मुश्रीफ-घाटगे, महाडिक-पाटील आमने सामने

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com