Kishor Jorgewar Sarkarnama
विदर्भ

Kishor Jorgewar : राजकीय वादाने घेतला आमदार किशोर जोरगेवारांच्या ‘अम्मा की पढाई’चा बळी

Chandrapur Political News : अम्मा जोरगेवार यांच्या स्मारकाला व्यापाऱ्यांनी विरोध केला होता. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने नामकरणाला स्थगिती आणि स्मारक तोडण्याचे आश्वासन काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिले होते.

Rajesh Charpe

Chandrapur, 08 August : आमदार किशोर जोरगेवार यांच्या आईच्या नावे अम्मा चौकाच्या नामकरणावरून चंद्रपुरात मोठा राजकीय वाद रंगला आहे. या वादाशी काही संबंध नसताना ‘अम्मा की पढाई’ या उपक्रमाला खेचण्यात आले आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आमदाराच्या पुढाकाराने सुरू असलेला हा उपक्रम तात्पुरता बंद करण्यात आला आहे. दीक्षा भूमी संघर्ष समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप करून आंबेडकर महाविद्यालयात सुरू असलेला हा उपक्रम बंद करण्यासाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला होता.

आमदार किशोर जोरगेवार (Kishor Jorgewar) यांच्या आई अम्मा ह्या गांधी चौकात टोपल्या विकायच्या काम करत असे. हे त्यांचे उपजीविकेचे साधन होते. आमदार झाल्यानंतर किशोर जोरगेवार यांनी आपल्या आईच्या स्मृती कायम राहण्यासाठी गांधी चौकाचे ‘अम्मा चौक’ असे नामकरण करण्याचा प्रस्ताव चंद्रपूर महानगर पालिकेला दिला होता. त्या प्रस्तावास मान्यतासुद्धा देण्यात आली होती.

भोई समाजाच्या वतीने हा प्रस्ताव देण्यात आला होता, असा दावा आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने केला जात आहे. त्यासोबतच याच चौकाच्या शेजारी असलेल्या सात मजली व्यावसायिक इमारतीच्या शेजारी अम्मा जोरगेवार यांचे स्मारकही उभारले जात आहे. तेथूनच खऱ्या वादाला सुरुवात झाली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचे नाव बदलण्यास जोरदार विरोध दर्शविला. या विरोधात आंदोलन केले आणि महापालिका आयुक्तांना निवेदनही दिले होते.

दुसरीकडे, चंद्रपूर येथील स्वातंत्रसैनिक आणि तसेच एकाही शहीद झालेल्यांची नावे दिली जात नाही, टाळाटाळ केली जाते असे सांगून आमदाराच्या आईच्या नावाचा प्रस्ताव झटपट कसा मंजूर केला जातो, असा सवाल उपस्थित केला होता. सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र पाठवले होते. त्यामुळे असंतोषात आणखीच भर पडली होती.

दीक्षा भूमी संघर्ष समितीने पुढे हा वाद थेट बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या नावाशी जोडला. जोरगेवार आपल्या आईच्या नावाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात ‘अम्मा की पढाई’ हा उपक्रम राबवतात. या माध्यमातून डॉ. बाबासाहेबांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न ते करीत आहेत असल्याचा आरोप केला. हा वाद वेगळ्या वळणावर जात असल्याचे बघून आमदार जोरगेवार यांनी हा शैक्षणिक उपक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला.

दुसऱ्या जागेचा शोध घेऊन तो सुरू करण्यात येईल, असेही आमदार किशोर जोरगेवार यांनी जाहीर केले आहे. मात्र, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याची खंत आमदार जोरगेवार यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT