BJP Politics : 'महात्मा गांधी चौकाचे नाव बदलून स्वतःच्या आईचे...', भाजप आमदाराच्या प्रस्तावाने खळबळ, काँग्रेस आक्रमक!

BJP MLA Kishore Jorgewar Gandhi Chowk Chandrapur : चौकात आणि व्यावसायिक इमारतीच्या शेजारी स्मारक उभारले जात असलेल्या स्मारकाला येथील व्यापाऱ्यांचा विरोध आहे. महात्मा गांधी यांचे नाव बदलले जाणार असल्याने काँग्रेसनेही आंदोलन केले.
Vijay Wadettiwar, Sudhir Mungantiwar and Kishor Jorgewar
Vijay Wadettiwar, Sudhir Mungantiwar and Kishor JorgewarSarkarnama
Published on
Updated on

Kishore Jorgewar News : मित्रासाठी शासकीय निधी खर्च केल्याचा आरोप असलेले भाजपचे चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी आणखी एक वाद ओढवून घेतला आहे. चंद्रपूर शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या महात्मा गांधी चौकाचे नाव बदलून अम्मा जोरगेवार करण्याचा प्रस्ताव त्यांनी महापालिकेला दिला आहे. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. एवढेच नव्हे तर या चौकात उभारल्या जात असलेले स्मारक अवैध असल्याचेही सांगण्यात येते. आता यावरून चंद्रपूरचे वातावरण तापणार आहे.

जोरगेवारांनी आपल्या आईच्या नावाने स्मारक उभारत आहेत. हे स्मारक महापालिकेच्या सात मजली इमारतीला लागून बांधले जात आहे. जोरगेवार यांच्या आई अम्मा जोरगेवार याचा चौकात टोपल्या विकायच्या. त्यामुळे त्यांनी या जागेची स्मारकासाठी निवड केली आहे. स्मारकासोबतच गांधी चौकाला अम्मा जोरगेवार चौक असे नाव देण्याचा प्रस्ताव त्यांनी सादर केला आहे. त्यास मान्यतासुद्धा देण्यात आली आहे.

भर चौकात आणि व्यावसायिक इमारतीच्या शेजारी स्मारक उभारले जात असलेल्या स्मारकाला येथील व्यापाऱ्यांचा विरोध आहे. महात्मा गांधी यांचे नाव बदलले जाणार असल्याने काँग्रेसनेही आंदोलन केले. स्मारक आणि नामकरणाला विरोध दर्शवला आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन यास विरोध केला आहे. आयुक्तांनी अवैध स्मारक तोडण्याचे आश्वासन दिले आहे. सोबतच गांधी चौक हेच नाव कायम ठेवले जाईल असे आश्वासन दिले आहे. हे बघता नामकरण आणि स्मारकाचा मुद्दा संवेदनशील होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Vijay Wadettiwar, Sudhir Mungantiwar and Kishor Jorgewar
Raj Thackeray: राज ठाकरेंनी 'शेकाप'चा मेळावा 'मराठी'च्या मुद्द्यावर गाजवला,जयंत पाटलांनाही काढला चिमटा; म्हणाले...

जोरेगवारांची वडेट्टीवार, मुनगंटीवारांकडून कोंडी

आमदार जोरगेवार यांना पावसाळी अधिवेशनात भाजपसह विरोधकांनी चांगलेच घेरले होते. त्यांनी आपल्या मित्रासाठी नाल्यावर भिंत उभारली. त्यावर 90 लाखाचा शासकीय निधी खर्च केला. हा मुद्दा भाजपचे आमदार व त्यांचे प्रतिस्पर्धी सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला होता. विजय वडेट्टीवार यांनीही या वादात उडी घेतली होती. या प्रकरणाच तपास घेण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.

तोडग्याने दोन गट शांत...

दोन 'वारां'नी मिळून तिसऱ्या 'वारा'ला कोंडीत पकडले आहे. विशेष म्हणजे मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातील वाद टोकाचे झाले आहेत. जोरगेवार भाजपात आल्यापासूनच वादवादीला सुरुवात झाली. मुनगंटीवारांच्या विरोधात भाजपमधील त्यांचे पक्षांतर्गत विरोधक एकत्र आले आहेत. भाजपचे शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांच्या निवडीवरूनही हा वाद चांगलाच पेटला होता. शेवटी पक्षाच्यावतीने शहर अध्यक्ष जोरगेवार तर ग्रामीणचा अध्यक्ष मुनगंटीवार यांच्या समर्थकाला करून दोन्ही गटाला शांत केले आहे.

Vijay Wadettiwar, Sudhir Mungantiwar and Kishor Jorgewar
Nashik Kumbh Mela : कुणी निधी देता का निधी.. नाशिक महापालिकेवर कुंभमेळ्यासाठी कर्ज काढण्याची वेळ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com