Truk Drivers Strike
Truk Drivers Strike Sarkarnama
विदर्भ

Truk Drivers Strike : चक्काजाम आंदोलनात जाळपोळ करणे भोवले; 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Abhijeet Ghormare

Gondia News : विदर्भात अनेक ठिकाणी ट्रकचालकांनी आंदोलन केले. या आंदोलनांमध्येही टायरची जाळपोळ करण्यात आली.शांततेत सुरू असलेल्या चक्काजाम आंदोलनात जाळपोळ करणे आंदोलकांना चांगलेच भोवले आहे. याप्रकरणी गोंदिया पोलिसांनी 15 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

‘हिट अॅन्ड रन’च्या घटनांबाबत केंद्र सरकारने (Central Government) कडक शिक्षेची तरतूद असलेला कायदा केला आहे. या कायद्याला देशव्यापी विरोध होत आहे. देशभरात कायदा मंजूर झाल्यानंतर पडसाद उमटले. तीन दिवस ट्रक चालकांनी संप पुकारला. कायद्याविरोधात देशभरात संताप व्यक्त करण्यात आला. अशात सोमवारी (ता. 1) कुडवा नाका येथे सकाळी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

चक्काजाम आंदोलन करताना काहींनी रस्त्यांवर टायर जाळले. जाळपोळ करीत वाहतूक रोखण्यात आली. जयस्तंभ चौकातदेखील वाहतूक रोखण्यात आली. या आंदोलनामुळे संपूर्ण शहरात कोंडी झाली. त्यामुळे पोलिसांनी वरिष्ठांशी चर्चेनंतर कारवाईचा निर्णय घेतला. आता याप्रकरणी 15 जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (Truck Driver Strike)

अजित निरेशलाल फरदे (वय 22, रा. भागवतटोला), पवन तुकाराम रोकडे ( वय 30, रा. कुडवा ), रजत प्रेमलाल चव्हाण (वय 28, रा. फुलचूर), संदीप रमेश गौतम (वय 21, रा. कुडवा), राजेश मोहनलाल मेश्राम (वय 32, रा. कुडवा), सुशील श्रीकृष्ण गेडाम (वय 45, रा. कुडवा ), गणेश लक्ष्मण बावनथडे (वय 45, रा. कुडवा), कमलेश अशोक पोवारे (वय 35, रा. कुडवा), राजेंद्र मनोहर कावळे (वय 27, रा. कुडवा), रवींद्र राजेश हलमारे (वय 23, रा. नागरा), दिनेश गुन्नीलाल कटरे (वय 27, रा. पुरगाव), राकेश यशवंत वंजारी (वय 28, रा. भागवतटोला), मिथुन श्यामलाल पारधी (वय 31, रा. रामनगर कुडवा), रामकिशोर अनंतराम ठाकरे (वय 47, रा. सूर्याटोला), सोहनलाल मंसाराम शहारे (वय 40, रा. नागरा) यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जिल्हाधिकाऱ्यांनी गोंदियात मनाई आदेश लागू गेले होते. मनाई आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. विदर्भात अनेक ठिकाणी ट्रक चालकांनी आंदोलन केले. या आंदोलनांमध्येही टायरची जाळपोळ करण्यात आली. भंडारा जिल्ह्यातही रास्ता रोको करण्यात आला. पोलिस (Police) आल्यानंतरही आक्रमकपणा दाखविणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतरही पोलिसांशी झटापट करणाऱ्या एका आंदोलकाला पोलिस निरीक्षकांने श्रीमुखात भडकावली होती.

या घटनेचा व्हिडीओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाला होता. ही घटना ताजी असतानाच गोंदियात आंदोलकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आंदोलनात अनेक जण सहभागी होते. परंतु आम्ही फक्त जाळपोळ आणि कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधातच कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT