Uddhav Thackeray, Eknath Shinde Sarkarnama
विदर्भ

Uddhav Sena defection : उद्धव ठाकरेंची बड्या नेत्याने सोडली साथ; मशाल खाली ठेवत माजी शहरप्रमुख उचलणार धनुष्यबाण

Political News : शनिवारी शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत ते नागपूरमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत.

Rajesh Charpe

Nagpur News : नागपूर महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याच्या तयारीत असलेल्या उद्धव सेनेची आणखी एक विकेट पडली. उद्धव सेनेचे माजी नागपूर शहर प्रमुख राजू तुमसरे यांनी शिंदे सेनेत दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत ते नागपूरमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत.

रामटेक लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार प्रकाश जाधव यांचे कट्टर समर्थक म्हणून राजू तुमसरे ओळखल्या जाते. त्यांना सोडून ते शिंदे सेनेत दाखल होत असल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. शिवसेनचे (Shivsena) पूर्व विदर्भाचे संघटक किरण पांडव यांच्या नेतृत्वात तुमसरे व त्यांचे समर्थक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. एक-एक पदाधिकारी आणि कार्यकर्ता सोडून जात असल्याने उद्धव सेनेमध्ये मोठी अस्वस्थता आहे.

पंधरा दिवसांपूर्वी पूर्व विदर्भाचे संपर्क प्रमुख भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) नागपूरला येऊन गेले. त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. महापालिका निवडणुकीचा आढावा घेतला. महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी होईल की नाही हे आत्ताच सांगता येणार नसल्याने त्यांनी सर्व शिवसैनिकांनी स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा, असे स्पष्ट सांगून टाकले आहे.

यावर काही शिवसैनिकांनी महापालिकेच्या निवडणुकीकरिता पक्षातर्फे काही मदत मिळणार आहे की नाही अशी विचारणा त्यांच्याकडे केली असता त्यांनी नकार दिला.निवडणुका लढण्यासाठी पक्ष निधी देत नाही. ज्यांची कोणाची लढायची इच्छा आहे त्यांनी आपल्या बळावरच लढावे असेही भास्कर जाधव म्हणाले होते.

नागपूरचा दौरा आटोपून मुंबईत परतल्यानंतर भास्कर जाधव हेच नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यांनी वेळोवेळी आपली नाराजी बोलून दाखवली. ते उद्धव सेना सोडतील असे बोलले जात आहे. त्यांना शिंदे सेनेच्यावतीने निवृत्ती घेण्याऐवजी आमच्याकडे येण्याची ऑफर दिली आहे. भास्कर जाधव यांच्या निर्णय अद्याप पेंडिग आहे. मात्र बडे नेते सोडून जात असल्याने कार्यकर्ते मात्र अधिकच अस्वस्थ झाले असल्याचे दिसून येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT