
Mumbai News : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षाने सुरु केली आहे. त्यामुळे निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच वातावरण तापले आहे. मनसे व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने एकच मोर्चा काढण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील राजकारण 360 डिग्रीमध्ये फिरले आहे. राज व उद्धव ठाकरे हे दोन बंधू 5 जुलैला एकत्रित मोर्चा काढणारा आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारणाने आता कूस बदलली आहे.
येत्या काळात लवकरच मुंबई महापलिकेच्या निवडणूका होता आहेत. या निवडणुकीच्या तोंडावर मराठी-हिंदी वादाचा फटका बसू नये, यासाठी दुसरीकडे भाजपने सावधपणे पावले उचलली आहेत. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्रित येणे कोणाच्या पथ्यावर पडणार? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
वर्षभरापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीने राज ठाकरेंना (Raj Thackeray) सोबत घेतले. पण लढण्यासाठी एकही जागा दिली नाही. तर विधानसभेला राज ठाकरेंचा स्वबळावर लढला. त्यात पक्षाला भोपळा मिळाला. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राज यांना महायुतीत स्थान मिळण्याची शक्यता कमीच आहे. गेल्या काही दिवसापासून महायुतीमध्ये जोरदार इनकमिंग होत असल्याने इच्छुकांची गर्दी झालेली आहे. त्यातच महायुतीमध्ये भाजप स्वबळावर लढणार की एकत्रित याची घोषणा केलेली नाही. त्यामुळे महायुतीमधील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष कन्फ्युज आहेत.
दुसरीकडे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच होत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्याचवेळी राज ठाकरे यांनी कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, असे वक्तव्य करीत राज ठाकरे यांनी बंधू उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)टाळी दिली. चार महिन्यापूर्वी राज ठाकरे यांनी मराठीसाठी वाद विसरून एकत्र येणार असल्याचे स्पष्ट केले होते. ती घोषणा आता त्यांनी या मोर्चाच्या निमित्ताने खरी करून दाखवली. त्यामुळे आता सत्ताधारी असलेल्या महायुतीसमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्याचमुळे आता येत्या काळात भाजपने रणनीती बदलली आहे.
मराठी मतांवर होणार परिणाम :
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंची युती झाल्यास त्याचा परिणाम मराठी मतांवर होईल. मराठी मतदार निर्णायक असलेल्या प्रभागांची संख्या 100 च्या आसपास आहे. दोन्ही ठाकरेंचा मतदार तसा बऱ्यापैकी सारखाच आहे. त्यामुळे दोघांची मतपेढी सोबत आल्यास भावनिक लाट निर्माण होऊ शकते. याचा फायदा दोन्ही पक्षांना होण्याची दाट शक्यता आहे.
एकनाथ शिंदे, भाजपला बसणार फटका:
आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापलिकेच्या निवडणूकात हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसे व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने घेतलेली भूमिका निर्णायक ठरणार आहे. एकत्र आलेले ठाकरे बंधू मराठी मतांवर मजबूत पकड मिळवू शकतात. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद कमी होण्याची शक्यता, कारण त्यांचा मोठा आधार मराठी मतदार होता.
भाजपची मदार हिंदीभाषिक मतदारावर आहे तर मनसे व ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी मराठी भाषिकांची मते महत्वपूर्ण ठरणार आहेत. त्यामुळे हिंदी भाषा सक्ती करता आली नाही तर भाजपला निवडणूक जड जाणार आहे. त्यामुळेच ऐन निवडणूक काळात हा मुद्दा कळीचा ठरणार असल्यानेच ठाकरे बंधूंनी भाजपची कोंडी केली आहे. त्यासोबतच भाजपासाठीही अडचणी निर्माण होऊ शकतात, विशेषतः मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसारख्या शहरी भागात परिणाम जाणवणार आहे.
शिवसेना, मनसे युतीचा फायदा होणार
येत्या काळात मनसेचा प्रभाव जिथे आहे तिथे शिवसेनेचे नेटवर्क आणि कार्यकर्ता यंत्रणा उपयोगी पडू शकते. तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा पुन्हा जोरात मांडला जाऊ शकतो. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीत युतीचा फायदा होणार आहे.
महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता?
ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्यामुळे महाविकास आघाडीमधील काँग्रेस व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात याबाबत संभ्रम वाटू शकतो, विशेषतः राज ठाकरे यांची हिंदुत्ववादी भूमिका लक्षात घेता. त्यांची अडचण होणार आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मनसेसोबत एकत्र येताना राष्ट्रीय स्तरावरील भूमिका ठरवावी लागणार आहे.
विधानसभा निवडणुकीवर परिणाम
एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंच्या गटाला मराठी मतांचा मोठा फायदा मिळू शकतो. विशेषतः शहरी भागात त्यांनी जोरदार कामगिरी केली, तर महाराष्ट्रातील सत्तेची समीकरणेच बदलू शकतात. त्यामुळे येत्या काळात या युतीचा फायदा या दोन पक्षांना होऊ शकतो.
मुंबई महापालिकेत मराठी मतदार निर्णायक असलेल्या प्रभागांची संख्या 100 च्या आसपास आहे. दोन्ही ठाकरेंचा मतदार तसा बऱ्यापैकी सारखाच आहे. त्यामुळे राज व उद्धव ठाकरे बंधू जर येत्या काळात खरोखरच एकत्र आले, तर त्याचा सर्वात मोठा फटका शिंदे गट आणि भाजप यांना बसू शकतो. तसेच, हे एकत्रीकरण महाराष्ट्राच्या मराठी अस्मितेच्या राजकारणाला पुन्हा चालना देऊ शकते. त्यामुळे येत्या काळात ठाकरे बंधू काय निर्णय घेणार, याची उत्सुकता लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.