Kishor Jorgewar  Sarkarnama
विदर्भ

Kishor Jorgewar : आमदार किशोर जोरगेवार यांचा भाजप प्रवेश कोणी रोखला?

BJP Entry Issue : हरियाणात भाजप हरणार, असे सर्वच सांगत होते. मात्र हरियाणाची निवडणूक त्यांनी जिंकून दाखवली. हरियाणात आम्हीच जिंकणार, असा विश्वास अमित शहा यांनी निवडणुकीपूर्वीच व्यक्त केला होता, असे मुनगंटीवार यांनी सांगितले

Rajesh Charpe

Nagpur, 14 October : ज्येष्ठ नेते शरद पवार अनेक आजी-माजी आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बाहेर पडलेल्या चाळीस आमदारांची भरपाई ते करीत आहेत. दुसरीकडे, शिंदेसेनाही अपक्ष आमदारांना गळाला लावत पक्षात प्रवेश देत असताना भाजपचा मात्र आयारामांना मोठा विरोध सुरू आहे.

चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार (Kishor Jorgewar) भारतीय जनता पक्षात प्रवेशाच्या तयारीत असताना चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपचे नेते तसेच राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या नाराजीचे कारण सांगून त्यांचा मार्ग रोखला आहे.

आमदार जोरगेवार यांच्या भाजपमधील प्रवेशाच्या चर्चेने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. आम्ही फक्त सतरंज्या उचलायच्या का, अशी त्यांची भावना आहे. मी कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, वारंवार निष्ठा बदलणाऱ्या व्यक्तीला प्रवेश द्यायचा का, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे असल्याचे सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सांगितले. हे बघता जोरगेवार यांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग सध्यातरी खडतर दिसत आहे. जोरगेवार यांनी भाजपचे उमेदवार नाना श्यामकुळे यांचा पराभव केला होता.

महायुती सरकार आणण्यासाठी ताकदीने जागा लढवणार आहोत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्याबाबत सूक्ष्म नियोजन करीत आहेत. हरियाणात भाजप हरणार, असे सर्वच सांगत होते. मात्र हरियाणाची निवडणूक त्यांनी जिंकून दाखवली. हरियाणात आम्हीच जिंकणार, असा विश्वास अमित शहा यांनी निवडणुकीपूर्वीच व्यक्त केला होता, असे मुनगंटीवार यांनी सांगितले

महायुतीच्या विजयासाठी आम्ही विजयादशमीपासूनच कामाला लागलो आहोत. आम्ही वर्षभर नियमित काम करत असतो. नियमित कामात कुठल्याही बदल होत नाही. आचारसंहितेच्या काळात फक्त उद्‌घाटने, भूमिपूजन आणि निर्णय घेऊ शकत नाही, एवढंच. त्यामुळे आचारसंहितेचा आम्हाला काही फरक पडणार नसल्याचा विश्वासही या वेळी सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

महविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी प्रचंड भाडणे आहेत. यावरून मतभेदसुद्धा आहेत. आता महायुतीने उमेदवार जाहीर केल्यावर आम्ही आमचा उमेदवार जाहीर करू, असे ते सांगत आहे. आमच्या उमेदवारावर ते आपला उमेदवार ठरवणार आहेत का, असा सवालही मुनगंटीवार यांनी केला.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT