Vijay Wadettiwar Sarkarnama
विदर्भ

Maharashtra Congress President : काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष कोण होणार? वडेट्टीवार म्हणाले, 'मी जबाबदारी स्वीकारण्यास ....'

Wadettiwar responds to Congress state president: काँग्रेसचा आता नवा प्रदेशाध्यक्ष कोण याची चर्चा सुरू झाली आहे. विधान सभेचे माजी विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येते.

Rajesh Charpe

Nagpur News : विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. राज्यातील मोठा भाऊ म्हणणाऱ्या काँग्रेसचे अवघे सोळा आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा मागण्यात आला असल्याचे समजते. त्यामुळे आता नवा प्रदेशाध्यक्ष कोण याची चर्चा सुरू झाली आहे. विधान सभेचे माजी विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येते.

पटोले यांच्या राजीमान्याबाबत विचारणा केली असता वडेट्टीवार (Vijay Wadettivar) म्हणाले, याबाबत मला काही माहिती नाही. माध्यमातूनच ही माहिती माझ्यापर्यंत पोहचली आहे. त्याबाबत आत्ताच काही बोलणे उचित होणार नाही. मात्र पक्षाने आजवर जी मला जबाबदारी दिली ती योग्य प्रकारे पार पाडली आहे. आता जी जबाबदारी देईल, आदेश देईल तोसुद्धा प्रामाणिकपणे पाळली जाईल ,असे सांगून त्यांनी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्यास इच्छुक असल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित केले.

महाविकास आघाडीच्या (MVA) असलेल्या एकाही पक्षाच्या दहा टक्केसुद्धा जागा निवडून आल्या नाहीत. त्यामुळे वडेट्टीवार यांचे विरोधीपक्षनेते पदही गेले आहे. नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात हे प्रदेशाध्यक्षपदाचे मुख्य दावेदार होते. थोरात हे पराभूत झाले आहेत. त्यामुळे पटोले यांनी राजीनामा दिल्यास वडेट्टीवार यांचा नंबर लागू शकतो, अशी चर्चा आहे.

विधानसभेत झालेल्या पराभवावर बोलतान वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्रातील निवडणुकीचा निकाल कोणालाच पचनी पडला नाही. अनेकांना याबाबत शंका आहे. 2014 मध्ये मोदी लाट असताना काँग्रेसने 42 जागा जिंकल्या होत्या. सरकार विरुद्ध जनमत असताना भाजप कशीकाय निवडून येऊ शकते असा प्रश्न जनता विचारत आहेत, असेही वडेट्टीवार म्हणाले.

लाडकी बहीणच्या नावाने फार फार पाच टक्के मते मिरली असती यापेक्षा भरघोस मताने निवडून येईल, अशी कुठलीची कामगिरी महायुती सरकारने केली नाही. शेवटच्या टप्प्यात महायुतीत वाद होता. उलट महाविकास आघाडीत चांगला समन्वय होता. आम्ही सामूहिक लढलो. असे असताना जाहीर झालेला निकाल हा धक्कादायक आहे. हा विजय भाजप महायुतीचा नसून ईव्हीएमचा आहे, असा आरोपही यावेळी वडेट्टीवार यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT