Mumbai News : राज्यातील जनतेने विकासाकडून बघून या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश दिले आहे. राज्यातील जनतेने मोठा जनादेश दिला आहे. सरकारच्या कल्याणकारी योजनेच्या पाठीशी जनता ठामपणे उभी राहिली आहे. जनतेने दिलेला कौल मान्य करीत आहे. राज्य सरकरची लाडकी बहीण योजना ही गेमचेंजर ठरली असल्याची कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीतील मिळालेल्या विजयानंतर ते प्रसार माध्यमांशी बोल्ट होते. महायुतीला मिळालेल्या यशामुळे हुरळून न जाता येत्या काळात आम्ही काम करीत राहणार आहोत. आमच्या पाठीशी केंद्र सरकार आहे. त्यामुळे येत्या काळात आम्ही काम करणार आहोत. लोकसभेतील अपयश मान्य करून आम्ही त्यामधून सावरलो आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
येत्या काळात आर्थिक शिस्त आणावी लागणार आहे. त्यामुळे त्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. राज्याच्या सर्वागीण विकासासाठी आम्ही सतत कार्यरत राहणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.