Local Body Elections Sarkarnama
महाराष्ट्र

Zilla Parishad election date: मोठी बातमी ! जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा मुहूर्त ठरला? विधिमंडळाचे अधिवेशनच पुढे ढकलणार?

Panchayat Samiti elections Maharashtra News : दुसऱ्या टप्प्यात होत असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा मुहूर्त ठरला आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका गेल्या चार वर्षांपासून रखडल्या होत्या. या रखडलेल्या निवडणुकीला आता मुहूर्त लागला आहे. राज्यातील 288 नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारी पार पडली. त्यासाठी 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. त्यातच आता दुसऱ्या टप्प्यात होत असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा मुहूर्त ठरला आहे. त्याची घोषणा दोन दिवसातच होणार असल्याची माहिती सुत्राने दिली.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात होत असलेल्या 288 नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. तर तिसऱ्या टप्यात राज्यातील महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

त्यातच आता राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा मुहूर्त देखील आता ठरला आहे. त्याची घोषणा दोन दिवसातच होणार असल्याची माहिती सुत्राने दिली. त्यामुळे पुढच्या महिन्यात होत असलेले राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या तिसऱ्या अथवा शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीची घोषणा लवकरच राज्य निवडणूक आयोगाकडून (Election Commission) करण्यात येणार असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 8 ते 20 डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता होती. त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका 20 डिसेंबरनंतर होतील, अशी शक्यता होती. मात्र, आता यामध्ये बदल होणार असून दोन दिवसात निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यामुळे येत्या 20 ते 25 दिवसांत या निवडणुका होतील, अशी शक्यता आहे. तर महापालिकेच्या निवडणुका त्यानंतर जानेवारी महिन्यात पूर्ण केल्या जातील, असे समाजते.

त्यामुळे 22 ते 30 डिसेंबर दरम्यान राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सर्वच प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीच्या कामाला लागली आहे. नगरपालिका व नगरपंचायतीनंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीला मुहूर्त लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT