Vinod Ghosalkar Sarkarnama
मुंबई

Abhishek Ghosalkar Case : आमच्या विरोधात षडयंत्र; लेकाच्या हत्येने हादरलेल्या विनोद घोसाळकरांच्या तीव्र भावना

Vinod Ghosalkar on Aabhishek Ghosalkar Murder and Alligation : मुलाच्या हत्येनंतर प्रथमच विनोद घोसाळकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत...

सरकारनामा ब्यूरो

Uddhav Thackeray Shiv Sena News Mumbai :

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या फेसबुक लाइव्ह सुरू असताना घडलेल्या हत्येच्या घटनेने सर्वच हादरले. अभिषेक यांच्या हत्येने घोसाळकर कुटुंब पुरते हादरले आहे.

एक बाप कोणत्याही संकटाचा सामना करू शकतो. पण तरुण मुलाच्या पार्थिवाला खांद्या देण्याची वेळ कोणत्याही बापावर येऊ नये, असे बोलले जाते. Abhishek Ghosalkar यांच्या हत्येने ही दुर्दैवी वेळ माजी आमदार आणि ठाकरे गटाचे उपनेते विनोद घोसाळकर यांच्यावर आली आहे. या घटनेने विनोद घोसाळकर हादरले आहेत. मुलाच्या हत्येवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यामुळे उद्विग्न झालेल्या विनोद घोसाळकर यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.

'माझ्या कुटुंबावर मोठा आघात'

माझा मुलगा अभिषेकची विश्वासघाताने निर्घृण हत्या करण्यात आली. हा माझ्या कुटुंबावरील मोठा आघात आहे. आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशावेळी अश्लाघ्य आणि बिनबुडाचे आरोप करून माझी, माझ्या मुलाची आणि माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा हिडीस प्रकार सुरू आहे. असे खोटेनाटे आरोप सहन केले जाणार नाहीत. माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी तत्काळ थांबवा, असे जारी केलेल्या एका निवेदनात विनोद घोसाळकर यांनी म्हटले आहे.

'किळसवाणा प्रकार थांबवा'

अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर घोसाळकर यांच्याबाबत आक्षेपार्ह बाबी पसरवल्या जात आहेत. एका निवेदनाद्वारे अभिषेक यांचे वडील विनोद घोसाळकर यांनी हा किळसवाणा प्रकार थांबवण्यासाठी बजावले आहे.

'1982 पासून मी सक्रिय राजकारणात आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 80 टक्के राजकारण आणि 20 टक्के समाजकारण या सूत्राचे तंतोतंत पालन करत आहे. मी आणि माझा पुत्र अभिषेक आम्ही निरपेक्षपणे आणि निष्ठेने राजकारण आणि समाजकारण केले आहे. शिवरायांच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत. निष्कलंकपणे आम्ही सामाजिक जीवनात वावरत आहोत, कोणताही डाग आमच्यावर नाही. मी मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलो. नंतर विधानसभेवर निवडून गेलो. मुलगा अभिषेक, सून तेजस्वी हे सुद्धा नगरसेवक म्हणून निवडून आले. जनतेचे प्रेम आणि विश्वास आम्हाला मिळाला. त्याला आम्ही कधीही तडा जाऊ दिला नाही. जनतेची आम्ही नि:स्वार्थपणे सेवा केली', असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'षडयंत्र रचले जात आहे'

अभिषेकची विश्वासघाताने हत्या करण्यात आली. हा आमच्यावर मोठा आघात आहे. आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशावेळी अश्लाघ्य असे बिनबुडाचे आरोप करून आमचे राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. आमच्या बदनामीचा हिडीस प्रकार सुरू आहे. ही बदनामी कृपा करून तत्काळ थांबवा, अशी माझी कळकळीची विनंती आहे. आम्ही काही गुन्हा केला असेल आणि त्याचे पुरावे असतील तर खुशाल तक्रार नोंदवा. पण खोटेनाटे आरोप सहन करणार नाही. दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्यावर होत असलेले आरोप म्हणजे मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा किळसवाणा प्रकार आहे, अशा तीव्र भावना घोसाळकर यांनी निवेदनात व्यक्त केल्या आहेत.

edited by sachin fulpagare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT