Yogesh Kadam-Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Shivsena Politic's : गोऱ्हेंनंतर शिवसेना मंत्र्याचे ठाकरेंवर गंभीर आरोप; 'मातोश्री'वरील रेटकार्डच सांगितले...

Yogesh Kadam Allegations On Matoshri : शिवसेनेत प्रामाणिकपणे राबणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्याला तिकिट न देता गिफ्ट देणाऱ्या कार्यकर्याला तिकिट दिलं जायचं. त्यामुळे अनेक जण शिवसेना सोडून गेले. मात्र गिफ्टच्या डिलबाबत मी बोलणार नाही, असेही मंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केले.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 25 February : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नवी दिल्लीत साहित्य संमेलनाच्या परिसंवादात बोलताना ‘उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की, एक पद मिळायचे,’ असे वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून राज्यात राजकीय धुरळा उडालेला असतानाच शिंदे यांच्या शिवसेनेतील आणखी एका मंत्र्यांने पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. लोकसभा, विधानसभा आणि पालिका निवडणुकीसाठी ‘मातोश्री’चं वेगवेगळं रेटकार्ड असायचं, असा आरोप गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी केला आहे.

शिवसेनेत प्रामाणिकपणे राबणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्याला तिकिट न देता गिफ्ट देणाऱ्या कार्यकर्याला तिकिट दिलं जायचं. त्यामुळे अनेक जण शिवसेना सोडून गेले. मात्र गिफ्टच्या डिलबाबत मी बोलणार नाही, असेही मंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी स्पष्ट केले.

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यानंतर शिवसेनेचे मंत्री योगेश कदम यांनी मातोश्रीवर पर्यायाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीसाठी मातोश्रीचं वेगवेगळं रेटकार्ड असायचं. त्यामुळे नीलम गोऱ्हे यांनी सांगितलेलं तथ्य डावलता येणार नाही, असा दावा योगेश कदमांनी केला आहे.

नीलम गोऱ्हे यांच्या विधानानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापासून संजय राऊतांपर्यंत महाविकास आघाडीच्या बहुतांश नेत्यांनी नीलम गोऱ्हे यांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी अत्यंत जहाल शब्दांत नीलम गोऱ्हे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

गोऱ्हे यांच्यानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. तिकिटासाठी पैसे घेतले जात असल्याचा आरोप कदम यांनी केला आहे. विशेष म्हणजे लोकसभा, विधानसभा आणि पालिका निवडणुकीसाठी मातोश्रीवर वेगवेगळे रेट कार्ड होते, असा दावा केला आहे, त्यामुळे ठाकरेंभोवती पुन्हा एकदा संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT