Ajit Pawar-Jayant Patil
Ajit Pawar-Jayant Patil Sarkarnama
मुंबई

NCP MLA Meet Jayant Patil : अजित पवार गटातील आमदारांचे जयंत पाटलांशी गुफ्तगू; विधीमंडळात घेतली भेट...

Vijaykumar Dudhale

Mumabi, 27 June : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ऐन विधीमंडळ अधिवेशनात धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण, अजित पवार गटाचे आमदार हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. त्या गोष्टीला दुजोरा देणारी घटना आज मुंबईत घडली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गटातील चार ते पाच आमदारांनी आज (ता. 27 जून) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची भेट घेतल्याची माहिती आहे, त्यामुळे अजित पवार गटाचे टेन्शन वाढण्याची चिन्हे आहेत. यात पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिक विभागातील आमदार असल्याचे सांगण्यात येत आहे. अर्थसंकल्प मांडल्यानंतर हे आमदार पुढील पाऊल उचलण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आज अधिवेशनाच्या निमित्ताने विधिमंडळात आले होते. त्याचवेळी अजित पवार गटातील चार ते पाच आमदारांनी त्यांची एका खोलीत भेट घेतल्याची माहिती आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिक भागातील आमदारांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या भेटीनंतर अजितदादा गटाचे आमदार हे शरद पवार गटाचे संपर्कात असल्याच्या चर्चेला एक प्रकारे दुजोरा मिळत आहे.

अजित पवार यांच्या कोणत्या आमदारांनी जयंत पाटील यांची भेट घेतली. त्या आमदारांची नावे मिळू शकली नाहीत. मात्र ही भेट झाल्याचे सूत्रांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसलेला फाटका लक्षात घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अजित पवार गटातील काही आमदारांनी रणनीती आखल्याचे दिसून येत आहे. त्या रणनीतीचा एक भाग म्हणूनच या आमदारांनी आज जयंत पाटील यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीत कांद्याच्या प्रश्नामुळे महायुतीचा आठ ते दहा जागांवर पराभव झाला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही कांदा निर्यातबंदीचा फटका बसू नये, यासाठी या आमदारांकडून अगोदरच तजबीज करायला सुरुवात करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT