Mumbai News : राज्यातील महापालिका निवडणुकीची घोषणा लवकरच होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष गेल्या सहा महिन्यापासून कामाला लागले आहेत. मुंबई महापालिकेवर एकसंध शिवसेनेची गेल्या 25 वर्षांपासून सत्ता आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेतून पायउतार करण्यासाठी भाजपकडून गेल्या काही दिवसापासून प्लनिंग करण्यात येत आहे. त्यातच मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाजप नेते व आमदार अमित साटम यांनी मोठा दावा केला आहे. आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीत मुंबई महापालिकेत सत्तापरिवर्तन निश्चित आहे. त्यासोबतच महायुतीला किती जागा मिळू शकतात, याचा मोठा दावा त्यांनी केला आहे.
मुंबई महापालिकेत गेल्या 25 वर्षांपासून एकसंध शिवसेनेची (Shivsena) सत्ता आहे. मात्र, नऊ वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या खालोखाल जागा भाजपला मिळाल्या होत्या. त्यामुळे या निवडणुकीत भाजपसाठी मोठी संधी चालून आली आहे. विशेष म्हणजे त्यावेळी एकसंध असलेल्या शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यामुळे भाजप मुंबई महापालिकेवर ताबा मिळवण्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून भाजपने प्लॅनिंग सुरु केले आहे. त्यातच आता महापालिका निवडणुकीसाठी भाजपने 144 जणांची टीम नेमली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालाडमधील प्रभाग क्रमांक ४७ येथील निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन केले. याप्रसंगी बोलताना आमदार अमित साटम यांनी महायुतीच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेत 150 हून अधिक जागा जिंकून महायुतीचाच महापौर निवडून येईल, असा विश्वास व्यक्त केला. त्यासोबत त्यांनी यावेळी मुंबईकरांमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीबद्दल मोठी उत्सुकता असल्याचे स्पष्ट केले.
अमित साटम यांनी यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली. “कोण एकत्र येतंय किंवा कोण एकत्र येत नाहीये हे महत्त्वाचं नाहीये. गेल्या 11 वर्षांत मुंबई शहराचा विकास कोणी केला, या शहरात मेट्रो कोणी आणली, अटल सेतू कोणी केला, कोस्टल रोड कोणी केला किंवा बीडीडी चाळीतल्या मराठी माणसाला 560 फुटांचे घर कोणी दिले, हे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई महानगरपालिका ही कोणत्याही एका परिवाराची जहागीरी नसून ती मुंबईकरांची आहे. येत्या काळात मुंबईकरच तिचा ताबा घेतील. त्यासोबतच मुंबई महानगरपालिकेत १५० हून अधिक जागा जिंकून महायुतीचाच महापौर निवडून येईल, असेही यावेळी आमदार साटम यांनी ठामपणे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.