Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Anil Parab : ठाकरे गटाला 'सुप्रीम' न्यायाचा विश्वास; अनिल परबांनी दिले थेट पुरावेच

Shivsena MLA Disqualification Case : ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळण्याची अपेक्षा

Sunil Balasaheb Dhumal

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील सत्तासंघर्षात शिंदेंनी बाजी मारली. विधानसभाध्यक्षांनी ठाकरे गटाने घटनेत केलेल्या बदलाबाबत निवडणूक आयोगाला माहिती दिली नसल्याचा दावा केला. त्यामुळे ठाकरेंच्या पक्षाची घटनाच अमान्य करीत नार्वेकरांनी शिंदेंच्या बाजूने निकाल दिल्याचे बोलले जात आहे.

नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर आक्षेप घेत ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री अॅड. अनिल परब यांनी थेट पुरावेच दिले आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयात आम्हाला नक्कीच न्याय मिळेल, असा विश्वासही परब यांनी व्यक्त केला. ते खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते. यावेळी त्यांनी पक्षाच्या घटनेत 2018 मध्ये केलेल्या पक्षप्रमुखपदनिर्मितीच्या बदलाबाबत निवडणूक आयोगाला माहिती दिल्याचा दावा केला.

अनिल परब (Anil Parab) म्हणाले, 'संबंधित बदलाची माहिती सुप्रीम कोर्टात सादर करणार आहोत. तसेच देशभरातील सर्व माध्यमांना ही माहिती द्यायची की नाही, हा निर्णय पक्षप्रमुख घेतील. 2013 आणि 2018 मध्ये घटनेत जे काही बदल करण्यात आले, त्यांची सर्व कागदपत्रे निवडणूक आयोगाला दिलेली होती. मी हे सर्व काम पाहत असल्याने त्या सर्व गोष्टी मला माहिती आहेत.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

परबांनी त्यांच्याकडे सर्व पोचपावत्या असल्याचा दावाही केला आहे. ते म्हणाले, '1999 पासून दर पाच वर्षांनी आम्ही पक्षांतर्गत निवडणुका घेतलेल्या आहेत. 2013 आणि 2018 ची एन्डॉर्समेंट कॉपी दाखवलेली आहे. 2018 आणि 2022 या दोन्ही वर्षांची अॅक्नोलेजमेंट दाखवलेली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाला सादर केलेल्या कागदपत्रांची पोचपावती आमच्याकडे आहेत.'

नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर बोलताना परब म्हणाले, 'घटनेत नेमका घोळ काय हे अध्यक्षांनी सांगितले नाही. 1999 च्या घटनेनुसार निकाल दिला असे म्हणता, मग 2013 मधील चूक कशी कळली,' असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 'आता आम्ही सर्व पुरावे घेऊन सुप्रीम कोर्टात जाणार आहोत. तेथे आम्ही केलेली घटनादुरुस्ती योग्य की अयोग्य याचा निकाल लागेल. तेथे आम्हाला नक्कीच न्याय मिळेल,' असा विश्वासही परबांनी व्यक्त केला.

(Edited by Sunil Dhumal)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT