Aslam Shaikh Sarkarnama
मुंबई

Aslam Shaikh : मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अस्लम शेख यांचा पारा चढला; काय आहे कारण ?

Mumbai District Meeting : काँग्रेस-भाजप आमने-सामने

सरकारनामा ब्यूरो

जुई जाधव

Mumbai Political News : मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चांगलीच खडाजंगी झाली. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त व पोलिस आयुक्त उपस्थित नव्हते. त्यामुळे काँग्रेसचे आमदार अस्लम शेख आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. अनेक प्रश्न उपस्थित करून शेख यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

चेतना कॉलेज, वांद्रे येथे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हा नियोजनची बैठक पार पडली. यावेळी पोलिस आयुक्त व पालिका आयुक्त अनुपस्थित होते. या मुद्द्यावरून बैठक वादळी ठरली. मुंबईचे बडे अधिकारीच महत्त्वाच्या बैठकीला गैरहजर राहत असल्याने आमदार शेख यांचा पारा चढल्याचे पाहायला मिळाले.

अस्लम शेख (Aslam Shaikh) म्हणाले, 'मुंबई उपनगरातील विकासकामे, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या बैठकीला पालिकेचे आयुक्त व पोलिस आयुक्त उपस्थित नसणे हे दुर्दैवी आहे. यातून प्रशासन एवढ्या महत्त्वपूर्ण बैठकीला गांभीर्याने घेत नाही, हेच सिद्ध होते. आज अमली पदार्थांच्या विळख्यात अडकून मुंबईतील तरुण पिढीचे वर्तमान आणि भविष्य उद्ध्वस्त होत आहे. असे असताना पोलिस आयुक्तांच्या अनुपस्थितीमुळे या विषयाच्याअनुषंगाने चर्चा होऊ शकली नाही.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'बैठकीत सदस्यांनी मांडलेल्या मुद्द्यांसंदर्भात कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सदस्यांना प्राप्त होणारा अनुपालन अहवाल व प्रत्यक्ष वस्तुस्थिती यामध्ये प्रचंड तफावत असते,' असा आरोपही शेख यांनी यावेळी केला. परिणामी मुंबईत या बैठकीचीच चर्चा होती.

भाटी गावातील हिंदू स्मशानभूमी तोडण्यासाठी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुंबई (Mumbai) उपनगर जिल्हा प्रशासनाला जाब विचारत हा खटला मागे घेण्याची मागणीही यावेळी अस्लम शेख यांनी केली आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांची अनुपस्थिती, शेख यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांमुळे मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT